Pune District | मंचर येथे आज संविधान दिन
Updated On:

मंचर, – भारतीय संविधान दिनानिमित्त घोडेगाव येथे मंगळवार, दि.२६ रोजी गौरव समारंभ आयोजित करण्यात येणार आहे.
पंचायत समिती घोडेगाव येथील कार्यालयाच्या आवारात असलेल्या संविधान स्तंभ येथे संविधान दिनानिमित्त संविधान गौरव दिनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
भारतीय संविधान दिन असल्यामुळे आंबेगाव तालुक्यातील नागरिकांनी सकाळी ११ वाजता या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन गौतम खरात यांनी केले आहे.





