“अजूनही इडंस्ट्रीत टिकून राहण्यासाठी….”; वाढत्या वयावर अभिनेत्री चित्रांगदा सिंह स्पष्टचं बोलली!

Chitrangada Singh : बॉलीवूडमधील कलाकारांचे वाढते वय हा नेहमीच चर्चेचा विषय राहिलेला आहे. सिनेमांमध्ये पुरुष कलाकार त्यांच्यापेक्षा वयाने खूपच लहान असलेल्या अभिनेत्रीसोबत रोमाँस करताना स्क्रिनवर दिसतात. या सगळ्यात महिला कलाकारांना आपले वाढते वय यामुळे इंडस्ट्रीत काम करताना दबाब येता का? यावर अभिनेत्री चित्रांगदा सिंह हिने भाष्य करत आपले परखड मत व्यक्त केले आहे.
महिला कलाकारांनी खरोखरच तरुण दिसणे अपेक्षित आहे का? याबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली, ‘हे सर्वांसाठी आहे.’ “जर तुम्ही ७० वर्षांच्या महिलेची भूमिका करत असाल तर तुम्ही तिच्यासारखे दिसले पाहिजे. जर तुम्हाला ३० वर्षांच्या महिलेची भूमिका करायची असेल तर तुम्हाला ती कशी करायची हे माहित असले पाहिजे.”
पुढे अभिनेत्री म्हणाली, पुरुष कलाकारालाही हीच गोष्ट लागू होते. याचे उदाहरण देताना चित्रांगदाने बॅालीवूडचा खिलाडी कुमारचे उदाहरण दिले. अक्की (अक्षय कुमार) त्याच्या फिटनेसवर त्याच्या डाएटवर खूप लक्ष केंद्रित करतो, असे अभिनेत्रीने सांगितले. तसेच अभिनेत्री करिना कपूर आणि विद्या बालन यांच्या कामाचे कौतुक अभिनेत्रीने केले.
“काळ खूप बदलला आहे. करीना कपूर अद्भुत काम करत आहे. विद्या बालन खूप काम करत आहे.” सर्व कलाकार अजूनही इडंस्ट्रीत टिकून राहण्यासाठी प्रयत्नशील असतात. “एका विशिष्ट पद्धतीने दिसण्याच्या दबावाबद्दल निकोल किडमन, डेमी मूर यांना पहा, प्रत्येकजण (तरुण दिसण्याचा) प्रयत्न करत आहे. तुम्हालाही प्रयत्न करावे लागतील. अर्थात, कलाकारांना प्रत्येक गोष्टीत दबावाचा सामना करावा लागतो.” असेही चित्रांगदाने सांगितले.
लवकरच चित्रांगदा सिंह “बॅटल ऑफ गलवान” सिनेमात सलमान खानसोबत दिसणार आहे. हा सिनेमा पुढील वर्षाच्या सुरुवातीला प्रदर्शित होऊ शकतो, अशी माहिती आहे. अद्याप सलमानव्यतिरिक्त इतर कलाकारांची नावे रिव्हील करण्यात आलेली नाहीत.
हेही वाचा : दीपिका पादुकोणने हिजाब परिधान केल्याने नेटकऱ्यांनी केलं ट्रोल




