दीपिका पादुकोणने हिजाब परिधान केल्याने नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Deepika Padukone Trolled | अभिनेत्री दीपिका पादुकोणने हिजाब परिधान केल्यामुळे सोशल मीडियावर तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. दीपिका आणि रणवीर सिंहने अबू धाबी पर्यटनाच्या जाहिरातीसाठी खास लुक केला होता. ज्यात रणवीरने लांब दाढी ठेवलेली होती. तर जाहिरातीच्या शूटिंगसाठी दीपिकाने हिजाब परिधान केला आहे. मात्र यावरून तिच्यावर टीका केली जात आहे.
दीपिका पदुकोण सध्या अबू धाबीची ब्रँड अॅम्बेसेडर आहे. दीपिका आणि रणवीर यांनी ही जाहिरात पर्यटन प्रचारासाठी केली होती. ही जाहिरात अबू धाबीच्या संस्कृतीवर आधारित होती. दीपिकानं स्वतः ही जाहिरात तिच्या इंस्टाग्रामवर शेअर करत ‘माझं शांततेचं ठिकाण’ असं कॅप्शन दिलं.
या जाहिरातीत दीपिका दोन वेगवेगळ्या पोशाखांमध्ये दिसते. एकामध्ये ती जीन्स आणि पांढऱ्या टी-शर्टमध्ये तर दुसऱ्या दृश्यात तिने हिजाब परिधान केलेला पाहायला मिळत आहे. जाहिरातीत दीपिका आणि रणवीर शेख जायद ग्रँड मशीदचं सौंदर्य दाखवतात आणि तिथल्या शांततेबद्दल बोलतात.
View this post on Instagram
नेटकऱ्यांकडून ‘जय श्रीराम’चा नारा
‘ही पैशांसाठी काहीही करू शकते,’ एका नेटकऱ्याने म्हंटले आहे. तर काहींनी कमेंटमध्ये ‘जय श्रीराम’चा नारा दिला आहे. तर दीपिकाच्या समर्थकांनी तिला ट्रोल करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिलं. काहींनी, दीपिका जेव्हा भारतातील मंदिरांमध्ये जाते, तेव्हा तीही पारंपरिक आणि सभ्य कपडेच घालते. त्याचप्रमाणे, मशीदने तिने संस्कृतीचा आदर करत हिजाब परिधान केला, असे म्हंटले आहे.
दरम्यान, रणवीर सिंहचा ‘धुरंधर’ चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 5 डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. तर दुसरीकडे दीपिका पादुकोण शाहरुख खानसोबत ‘किंग’ या चित्रपटात झळकणार आहे.
हेही वाचा:





