काहींना मी प्रीती झिंटा तर, काहींना सनी लिओनीसारखी भासते- झरीन दुखावली

बॉलीवूड अभिनेत्री झरिन खानने पदार्पणातच सलमान खानसोबत काम केले आहे. तिने बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवल्यानंतर तिची गणना आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये केली जात होती. तिला कतरिना कैफची जुळी अभिनेत्रीचा टॅगही बसला होता. त्यानंतर तिची अनेक वेळा कतरिनाशी तुलना केली जात होती.
यावर आता झरिन खानने आपली चुप्पी तोडली आहे. कतरिनासारख दिसण्यामुळे तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. अनेक दिग्दर्शकांनी तिला डुप्लीकेट असल्याचे कारण देवून काम नाकारले असल्याची खंत झरीन खानने व्यक्त केली आहे. झरिन खानने एका मुलाखतीत सांगितले की, लोकं इंडस्ट्रीमध्ये आपली स्वतःची ओळख बनवायला येतात. कोणाची जुळी बनण्यासाठी किंवा कोणाची सावली बनण्यासाठी नाही.
मी गेल्या 11 वर्षांपासून बॉलीवूडमध्ये आपली जागा निर्माण करण्यासाठी संघर्ष करत आहे. पण आजही बहुतांशी लोक मला कतरिना कैफची जुळी असचं ओळखतात. त्यामुळे कोणताही दिग्दर्शक एखाद्या डुप्लिकेटसोबत काम करण्यास तयार नाही. झरीन खान म्हणाली, मला वाटतं माझा चेहरा वैश्विक आहे.
खरंतर मी अनेक लोकांसारखी दिसते. काही लोकं मला पूजा भट्टची जुळी असल्याचे म्हणतात. तर काही जणांना मी प्रीती झिंटा वाटते. तर काहींना मी सनी लिओनीसारखी भासते. पण मला समजत नाही, लोकांना मी झरिन खान का नाही वाटत, असे तिने सांगितले.





