“संसारातील मज्जा टिकवायला आणि…”; प्रिया बापट आणि उमेश कामत यांचा मजेशीर व्हिडिओ

Priya Bapat And Umesh Kamat | अभिनेत्री प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामत यांची मराठी सिनेसृष्टीतील जोडी लोकप्रिय आहे. या दोघांची केमेस्ट्री नेहमीच चाहत्यांच्या पसंतीस पडताना दिसते. सोशल मीडियावर देखील ही जोडी सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. नुकतेच त्यांचा एक मजेशीर व्हिडिओ समोर आला आहे.
प्रिया बापटने इंस्टाग्रामवर उमेश कामत सोबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत प्रिया उमेशला चांगले फोटो काढण्यास सांगते. त्यानंतर प्रिया पोज देते आणि उमेश फोटो काढतो. फोटो काढल्यानंतर प्रिया लगेच उमेशला सांगते की, फोटो बघू. मग उमेश तिला म्हणतो, तुला का बघायचेत? अगं, मी ते एडिट वगैरे करतो आणि मग तुला दाखवतो.
प्रिया त्याला मस्करीत म्हणते की, तू फोटो एडिट करणार आणि फोनमध्ये फोटो बघते. पण, फोनमध्ये तिला तिच्याऐवजी उमेशचेच फोटो दिसतात. तेवढ्यात ती उमेशला म्हणाली की, माझे फोटो कुठे आहेत? यावर उमेश म्हणाला की, तू म्हणालीस ना चांगले दिसतील असे फोटो काढ. तू असं कुठे म्हणालीस की, माझे फोटो काढ. हे ऐकताच प्रिया उमेशच्या मागे पळते आणि त्याला मारायला जाते.
View this post on Instagram
प्रियाने हा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, ‘संसारातील मज्जा टिकवायला, आणि काय हवं ?’ या व्हिडीओवर नेटकरीसह सेलिब्रेटींचा देखील कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. दोघांचा हा मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावर नेटकऱ्यांनी ‘घोर अपमान केला रे,’ ‘मस्त फसवलंय प्रियाला,’ ‘मस्त आलेत फोटो’, अशा कमेंट केल्या आहेत.
उमेश आणि प्रियाच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, उमेश शेवटचा ‘माय-लेक’ या चित्रपटात झळकला होता. तर ‘रफूचक्कर’ या हिंदी वेब सीरिजमध्ये प्रिया शेवटची झळकली होती. लवकरच उमेश ‘येरे येरे पैसा-३’ चित्रपटात पाहायला मिळणार आहे. Priya Bapat And Umesh Kamat |





