Pune District | सध्याचे उद्योजक अधिक सक्षम करायचेत

अकलूज : खासदार नवउद्योजक विकास उपक्रमाचा उद्देश नवीन उद्योजक निर्माण करणे आणि सध्याचे उद्योजक अधिक सक्षम करणे हा आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांबाबत माहिती देणे, बँकांकडून कर्ज मिळवून देण्यात मदत करणे आणि विविध उद्योग संस्थांशी करार करण्याची संधी उपलब्ध करून देणे हा मुख्य उद्देश आहे, असे प्रतिपादन माढा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील केले.
माढा लोकसभा मतदारसंघ व सोलापूर जिल्ह्यातील उद्योजक आणि नवोदित उद्योजकांसाठी गुजरात गांधीनगर येथे शिवरत्न शिक्षण संस्था आणि शिवामृत दूध संघ यांच्या सहकार्याने एक विशेष अभ्यास दौर्याचे आयोजन केले आहे. खासदार नवउद्योजक विकास कार्यक्रमाचा समारंभ संपन्न होऊन अभ्यास दौर्यात सहभागी होण्यासाठी इच्छुक उद्योजक व्यावसायिकांच्या करीता शिवरत्न नॉलेज सिटी अकलूज परीक्षा संपन्न झाली. या वेळेस खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची प्रमुख उपस्थितीत होती त्यांनी उद्योजक व्यावसायिकांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमा प्रसंगी शिवरत्न शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा शितलदेवी मोहिते-पाटील, बँक ऑफ बडोदाचे मुख्य व्यवस्थापक मनिषकुमार सिन्हा,अशांक चांदणे, जितेंद्र बाजारे, शिवामृतचे उपाध्यक्ष दत्तात्रय भिलारे, शिवरत्न शिक्षण संस्थचे सचिव धर्मराज दगडे, संचालक डॉ. विश्वनाथ आवड, प्रशांत जगताप, श्रीकांत राऊत, नितीन बनकर, प्रशासन अधिकारी अश्रफ शेख आदी मान्यवर उपस्थित होते.





