“एका वाट चुकलेल्या सैरभैर मुलीला…”; अंकिता वालावलकरची पतीसाठी रोमॅंटिक पोस्ट

Ankita Walawalkar | ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातील अंकिता वालावलकर अर्थात कोकण हार्टेड गर्ल सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहे. काही दिवसांपूर्वीच संगीतकार कुणाल भगतशी तिने लग्नगाठ बांधली. कोकणातील कुडाळ येथे पारंपरिक पद्धतीने १६ फेब्रुवारीला तिचा विवाहसोहळा पार पडला. नुकतीच अंकिताने सोशल मीडियावर तिचा पती कुणाल भगतसाठी रोमॅन्टिक पोस्ट शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अंकिताने पती कुणालच्या वाढदिवसानिमित्त इन्स्टाग्रामवर खास पोस्ट लिहून शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अंकिताने लिहिले की, ‘प्रिय कुणाल, आज तुझा वाढदिवस…, आपण दोघेही सेलिब्रेशनच्या बाबतीत तसे अरसिक आहोत. पण आजचा दिवस तुझ्यापेक्षा जास्त माझ्यासाठी महत्वाचा आहे. आजच्या दिवशी एका घरात एक “मुन्ना” जन्माला आला आणि त्याने २ महिन्यापूर्वी एका वाट चुकलेल्या सैरभैर मुलीला तिच्या आयुष्यात स्थिरता मिळवून दिली. अंकिता अशी वागते हे जगाला दिसायचं पण ती का वागते ते तु शोधलंस.’
View this post on Instagram
पुढे तिने लिहिले की, “तुझ्या असण्याने मला कामाची अजुन ऊर्जा मिळत राहते. का जगावंन यापेक्षा आयुष्य किती येक नंबर आहे हे तू दाखवलंस. तुझ्या म्हणण्याप्रमाणे वाढदिवस म्हणजे आपण मागच वर्ष किती भारी जगलो याचं celebration असलं पाहिजे. मागच्या वाढदिवसाला लग्नासाठी नाही म्हणणारी मी ह्या वाढदिवसाला तुझी बायको आहे अजून भारी काय असू शकत!!!!! ‘ Ankita Walawalkar |
‘मी हे म्हणणार नाही की देव तुझ्या सगळ्या इच्छा पुर्ण करो… मी हे म्हणेन की स्वामी मला एवढी ताकद देवोत की मी तुझ्या सगळ्या इच्छा पुर्ण करेन. तुला जन्मदिवसाच्या झापुक झुपूक शुभेच्छा!!! खूप काम कर, खुप मोठा हो. मी काय स्टुडिओत चटई टाकुन झोपेन. आता रात्री उशीरापर्यंत काम करायचं नाही, बरं का? हॅप्पी बर्थडे डार्लिंग नवऱ्या…”, अशी पोस्ट लिहित अंकिताने कुणालबद्दल प्रेम व्यक्त केले आहे. Ankita Walawalkar |
कुणाल आणि अंकिताची पहिली भेट एका अॅवार्ड कार्यक्रमावेळी झाली असल्याचे अंकिताने अनेक मुलाखती दरम्यान सांगितले आहे. त्यानंतर दोघेही रिलेशनमध्ये आली आणि त्यांनी अखेर लग्न करण्याचा निर्णय घेतला. मोठ्या थाटामाटात अंकिता आणि कुणालचं लग्नसोहळा पार पडला.
हेही वाचा :
शरद पवार-एकनाथ शिंदे आज कोकणात? मोठे पक्ष प्रवेश होणार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण





