Political News : मोठी बातमी..! ‘या’ पक्षाचे तब्बल ५८ आमदार फुटले; राज्याच्या राजकारणात खळबळ
Political News : पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेले नेते ऋतब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली टीएमसीच्या तब्बल ५८ बंडखोर आमदारांनी बंड पुकारले आहे.

Political News : पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस पक्षांतर्गत चाललेल्या वादाला बुधवारी अत्यंत नाट्यमय आणि निर्णायक कलाटणी मिळाली. पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेले आमदार ऋतब्रत बॅनर्जी यांना टीएमसीच्या ५८ बंडखोर आमदारांनी विधीमंडळ पक्षनेते म्हणून पाठिंबा दिला आहे. (Political News)
या आमदारांनी आपल्या स्वाक्षऱ्यांचे समर्थन पत्र विधानसभा अध्यक्ष रथींद्र बोस यांच्याकडे सुपूर्द केले असून यामुळे राज्यातील विरोधी पक्षाच्या संपूर्ण रचनेत मोठे फेरबदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Political News)
दरम्यान, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचा पक्ष फुटल्यानंतर आता पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला आहे. टीएमसीच्या तब्बल ५८ आमदारांनी बंडखोरी करत आपला वेगळा गट स्थापन केला आहे. (Political News)
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य बंडखोर चेहरा ठरलेले ऋतब्रत बॅनर्जी आणि सहकारी आमदार संदीपन साहा यांच्यासह अनेक असंतुष्ट आमदारांनी विधानसभा अध्यक्षांची भेट घेतली. त्यांनी ५८ आमदारांच्या पाठिंब्याचे अधिकृत पत्र सादर करत एका नव्या विधीमंडळ गटाची घोषणा केली. (Political News)
यामध्ये ऋतब्रत बॅनर्जी यांची पक्षनेतेपदी, तर जावेद खान, संदीपन साहा आणि शिउली साहा यांची उपनेतेपदी निवड करण्यात आली आहे. तसेच रघुनाथगंजचे आमदार अखरुझामन यांच्याकडे मुख्य प्रतोद पदाची धुरा सोपवण्यात आली आहे.
भारतातील कडक पक्षांतर बंदी कायद्यानुसार विधानसभेचे सदस्यत्व रद्द होऊ नये म्हणून कोणत्याही बंडखोर गटाला मूळ विधीमंडळ पक्षातील किमान दोन-तृतीयांश आमदारांचा पाठिंबा असणे अनिवार्य असते. पश्चिम बंगाल विधानसभेत सध्या तृणमूल कॉंग्रेसचे एकूण ८० आमदार आहेत. (Political News)
ज्यानुसार अपात्रतेपासून वाचण्यासाठी किमान ५४ आमदारांची गरज आहे. बंडखोर गटाने ५८ आमदारांच्या स्वाक्षऱ्या सादर केल्यामुळे त्यांनी हा टप्पा सहज पार केला आहे. विधानसभा अध्यक्षांनी हा दावा मान्य केल्यास या बंडखोर गटाला सभागृहात स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळण्याची शक्यता बळावली आहे.
अभिषेक यांच्यावर निशाणा (Political News)
या संपूर्ण बंडामध्ये एक महत्त्वाचा राजकीय संकेत पाहायला मिळत आहे. विधानसभा अध्यक्षांना दिलेल्या पत्रात बंडखोरांनी ममता बॅनर्जी यांचा उल्लेख पक्षाच्या अध्यक्षा असाच केला आहे. याचा अर्थ बंडखोरांचा हा लढा ममता बॅनर्जी यांच्याविरुद्ध नसून, केवळ विधीमंडळ पक्षाच्या सध्याच्या नेतृत्वाविरोधात आहे. (Political News)
असा संदेश द्यायचा आहे. यासोबतच, पक्षाचे अंतर्गत व्यवहार आणि निर्णय प्रक्रियेत अभिषेक बॅनर्जी यांचा वाढता हस्तक्षेप आपल्याला मंजूर नाही, असेही बंडखोर आमदारांनी स्पष्ट केले आहे. (Political News)
तांत्रिक चुकीमुळे संकट (Political News)
या संपूर्ण वादाची पाळेमुळे ६ मे रोजी ममता बॅनर्जी यांच्या निवासस्थानी झालेल्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत आहेत. या बैठकीत विरोधी पक्षनेते आणि प्रतोद निवडण्याचे अधिकार पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाला देण्यात आले होते. (Political News)
त्यानुसार, पक्षाने सोवनदेब चट्टोपाध्याय यांची विरोधी पक्षनेतेपदी आणि फिरहाद हकीम यांची मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती करण्याचे पत्र विधानसभा सचिवालयाला दिले होते. परंतु, विधानसभा नियमांनुसार अशा पदाधिकाऱ्यांची निवड ही विधीमंडळ पक्षाच्या अधिकृत आणि रीतसर बैठकीतच होणे आवश्यक असते. (Political News)
या तांत्रिक त्रुटीमुळे सचिवालयाने त्यावर कोणतीही कारवाई केली नाही. याच विलंबाचा फायदा घेत बंडखोर आमदारांनी आपल्या जुन्या स्वाक्षऱ्यांचा गैरवापर झाल्याचा आरोप केला आणि अंतर्गत मोट बांधून हे बंड पुकारले.
तृणमूलकडून विश्वासघाताचा आरोप
तृणमूल काँग्रेसच्या मुख्य नेतृत्वाने या बंडाला विश्वासघात असे म्हटले आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार कुणाल घोष यांनी बंडखोरांवर सडकून टीका केली. ते म्हणाले, जर आमदारांना काही अडचणी किंवा तक्रारी असत्या, तर त्यांनी पक्षाच्या अंतर्गत मंचावर चर्चा करायला हवी होती. (Political News)
असे न करता त्यांनी पाठीत सुरा खुपसण्याचे काम केले आहे. घोष यांनी बंडखोर आमदारांचा गद्दार असा उल्लेख करत, टीएमसी या संकटावर मात करेल आणि ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली पक्ष एकसंध राहील, असा विश्वास व्यक्त केला. (Political News)
वाढत्या अंतर्गत संकटाच्या पार्श्वभूमीवर, पक्षाच्या नेतृत्वाने बुधवारी एक मोठे पाऊल उचलत राज्यातील सर्व प्रमुख समित्या आणि सहयोगी संघटना भंग केल्या आहेत.पक्षाने स्पष्ट केले आहे की, संघटनेच्या प्रत्येक स्तरावर व्यापक आत्मपरीक्षण, कामगिरीचा आढावा आणि संघटनात्मक मूल्यांकन केले जाईल आणि लवकरच नव्याने संघटनेची पुनर्रचना करण्यात येईल. (Political News)





