Thane Corporation Elections Exit Poll: ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मदतान पार पडले आहे. ठाणे महापालिलेच्या 33 प्रभागांमधून 131 नगरसेवक पालिकेत निवडून जाणार आहेत. मतदान झाल्यानंतर आता एक्झिट पोलचे आकडे समोर येत आहेत. एक्झिट पोलमध्ये शिंदे गट एक नंबरचा पक्ष ठरत असल्याचे दिसत आहे. ठाणे महापालिका निवडणुकीत भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत युती झालेली आहे. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्र निवडणूक लढवली. त्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शदरचंद्र पवार आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र निवडणुकीच्या रिंगणात उतरले. यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी ठाण्याची निवडणूक प्रतिष्ठेची आहे. दरम्यान महापालिकेसाठी झालेल्या मतदानानंतर एक्झिट पोल समोर आले आहेत. एकनाथ शिंदेंचा बाल्लेकिल्ला असलेली ठाणे महानगरपालिकेत शिंदेंच मोठा पक्ष राहणार असल्याचा अंदाज सर्व्हेक्षणात वर्तवण्यात आला आहे. शिंदे गट शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. भाजप दोन नंबरचा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान, ठाण्यात भाजप 26, शिंदेसेना 72, राष्ट्रवादी (अजित पवार) 10, काॅंग्रेस 3, ठाकरेसेना 3, राष्ट्रवादी (शरद पवार) 15, मनसे 2 जागा मिळतील अशी शक्यता एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आली आहे.