पुणे जिल्हा | आळंदी किड्स गॉट टॅलेंटची तीर्था मानकरी

आळंदी, ( वार्ताहर) – येथील प्रियदर्शनी स्कूल आयोजित आळंदी किड्स गॉट टॅलेंट या डान्स् स्पर्धेत राज म्युझिक अँड डान्स क्लासेस मधील 6 वर्षीय तीर्था मुसळे हिने प्रथम क्रमांक मिळवून विजयी झाली. तिला सुप्रसिद्ध अभिनेते संदीप पाठक यांच्या हस्ते 50 हजार 1 रुपयांचे रोख व भव्य चषक बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी तीर्थाची आई माधुरी मुसळे, वडील दीपक मुसळे, गुरु अमोल जाधव आदी उपस्थित होते. मागील 2 वर्षांपासून तीर्था राज म्युझिक अँड डान्स क्लासेसमध्ये नृत्य प्रशिक्षण घेत आहे. तीर्थाच्या आजच्या यशाच्या पाठीमागे खरी मेहनत तिच्या आईची म्हणजेच माधुरी मुसळे यांची आहे.
अनेक कठिण परिस्थितीवर मात देऊन त्यांनी तीर्थाला आज या ठिकाणापर्यंत पोहोचवले आहे. राज म्युझिक अँड डान्स क्लासेस च्या वतीने तीर्थाचा क्लासमध्ये सत्कार करण्यात आला यावेळी क्लासेसचे संस्थापक अध्यक्ष राजेश आवळे यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.





