सततच्या नापिकीला कंटाळून शेतकऱ्याने संपवली जीवनयात्रा

हिंगोली – सततच्या नापिकीला कंटाळून शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. खंडूजी अश्रुबा खुडे असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. विहिरीमध्ये उडी घेऊन त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील रोहीला पिंपरी येथील शेतकरी राजाभाऊ देशमुख यांच्या शेतातील विहिरीत उडी मारून या शेतकऱ्याने आत्महत्या केली. बोरी पोलिस स्टेशनांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व बोरी येथील सरकारी रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. नंतर त्यांचे मुळ गाव हिवरखेडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा येथील शेतकरी खंडूजी खुडे हे आपल्या पोटाची खळगि भरण्यासाठी परभणी जिल्ह्यातील राहीलि पिंपरी येथे राजेभाऊ सूर्यभान देशमुख यांच्याकडे अनेक दिवसापासून सालाने कामाला होते. मात्र निसर्गाच्या लहरीपनामुळे शेतात काहीच उत्पादन होत नव्हते. त्यामुळे आपल्यावरील कर्ज कसे फेडायचे यांच चिंतेत ते नेहमी असायचे.
त्यांच्यावर सेनगाव येथील sbi शाखेचे पिक कर्ज आहे. हिवरखेडा येथील शेतीवर पिक कर्ज घेतले होते. सततच्या नापीकीमुळे कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून त्यांनी पोळा झाल्यावर करीच्या दिवशी दुपारी विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. त्यांच्या प्रश्नात पत्नी, तीन मुले, दोन सुना असा परिवार आहे. (Tired of constant barrenness, the farmer committed suicide)





