जाण्याची वेळ झाली ! अमिताभ यांचे पुन्हा तेच ट्विट; चाहत्यांना दिला मोठा संदेश

Amitabh Bachchan : बॉलिवूडचे महानायक म्हणजेच, अभिनेते अमिताभ बच्चन सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असल्याचे पाहायला मिळतात. त्यांच्या प्रोजेक्टबाबतचे अनेक अपडेट ते सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांशी शेअर करत असतात. काही दिवसांपूर्वी अमिताभ यांनी केलेल्या एक ट्विटमुळे चाहते घाबरले होते. अनेकांनी नेमकं काय झालं आहे? त्यांची तब्येत व्यवस्थित आहे ना? अशी विचारणा देखील केली.
अमिताभ यांनी ‘आता जाण्याची वेळ आली आहे’ असं ट्विट केलं होतं. पण याचा अर्थ चाहत्यांना समजला नव्हता. आता त्यांनी या ट्वीटचा अर्थ सांगितला आहे. अमिताभ बच्चन यांनी १५ फेब्रुवारीला पहाटे ३ वाजून ३२ मिनिटांनी ट्विट केलं आहे. त्यांनी ट्विट करत लिहिलं की, ‘जाण्याची वेळ आली आहे….झोपायला’.
गेल्या ट्विटमध्ये अमिताभ यांना नेमकं काय म्हणायचं आहे, हे चाहत्यांच्या लक्षात न आल्यामुळे गदारोळ झाला होता. त्यानंतर आता हे ट्विट शेअर करत अमिताभ बच्चन यांनी झोपायला जाण्याची वेळ आली आहे, असं सांगितले होत.
T 5287 – जाने का समय आ गया है …. सोने 😴
— Amitabh Bachchan (@SrBachchan) February 13, 2025
त्यानंतर आता अमिताभ यांनी चाहत्यांच्या प्रश्नाला उत्तर देत म्हंटलं आहे की, “माझी कामावर जाण्याची वेळ झाली आहे. कमाल आहात तुम्ही. मला इथून (केबीसी सेटवरून) रात्री २ वाजता सुट्टी मिळते, घरी पोहोचायला उशीर होतो. रात्री ते लिहिता लिहिता मी झोपी गेलो, त्यामुळे ते अर्धवट राहिलं आणि ‘जाण्याची वेळ झाली’ इतकंच लिहिलं आणि मी झोपलो.” असं ते म्हणाले आहेत.
T 5295(i) – इंटरनेट की बात क्या छेड़ दी, जिनका था, दौड़े दौड़े आ गये और ठीक करने लगे ; लेकिन ठीक हुआ नहीं ; मैंने बदलने का निर्णय ले लिया है, और काम भी शुरू हो गया है 😳😳😗😊
— Amitabh Bachchan (@SrBachchan) February 21, 2025
अमिताभ बच्चन ८२ वर्षांचे असून या वयातही ते काम करत आहेत. चित्रपट असो किंवा शो, ते उत्साहाने शूटिंग करताना दिसतात. अमिताभ बच्चन मागील वर्षी ते रजनीकांत यांच्यासोबत ‘वेट्टियन’ चित्रपटात दिसले होते. याशिवाय ते कल्की 2898 ADमध्ये देखील दिसले होते. सोशल मीडियावर महानायक सतत सक्रिय असून, आपल्या चाहत्यांच्या प्रश्नांना ते नेहमीच उत्तर देतात.





