टाईम मासिकाची टॉप १०० यादी जाहीर : ट्रम्प-युनूस ठरले ‘प्रभावशाली’, भारताला झटका

Top 100 Influential People List । प्रसिद्ध अमेरिकन मासिक टाईमने २०२५ सालासाठी जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. यामध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र यंदाच्या यादीत भारताला झटका बसला आहे.
१७ एप्रिल रोजी प्रसिद्ध झालेल्या या वर्षीच्या यादीत राजकारण, विज्ञान, कला आणि समाजसेवा या क्षेत्रातील लोकांचा समावेश आहे. ही यादी ‘लीडर्स’, ‘आयकॉन्स’ आणि ‘टायटन्स’ अशा अनेक श्रेणींमध्ये विभागली गेली आहे.
या लोकांनाही जागा मिळाली Top 100 Influential People List ।
या वर्षी ‘नेत्यांच्या’ यादीत ब्रिटिश पंतप्रधान केयर स्टारमर आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स सारख्या प्रमुख नावांचा समावेश आहे. मात्र, आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे यावर्षी टाइम मासिकाच्या या यादीत एकाही भारतीयाचे नाव नाही. तरीसुद्धा, ‘लीडर्स’ यादीमध्ये व्हर्टेक्स फार्मास्युटिकल्सच्या भारतीय वंशाच्या सीईओ रेश्मा केवलरामणी यांचे नाव समाविष्ट आहे. रेश्मा केवलरामणी या सार्वजनिक अमेरिकन बायोटेक्नॉलॉजी कंपनीच्या पहिल्या महिला सीईओ बनल्या आहेत.
आलिया भट्ट आणि साक्षी मलिक यांचे नाव Top 100 Influential People List ।
बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि ऑलिंपिक कुस्तीपटू साक्षी मलिक यांचे नाव टाईम मॅगझिनच्या २०२४ च्या यादीत समाविष्ट झाले होते. २०२५ ची यादी १७ एप्रिल रोजी ऑनलाइन प्रकाशित झाली होती आणि ती टाईम मासिकाच्या नवीनतम अंकात देखील उपलब्ध आहे. या वर्षीच्या यादीत सेरेना विल्यम्स, स्नूप डॉग, एलोन मस्क, ग्रेटा गर्विग, एड शीरन आणि रशियन विरोधी पक्षनेते अलेक्सी नवलनी यांच्या पत्नी युलिया नवलनाया यासारख्या इतर सेलिब्रिटींचा समावेश आहे. टाईमची ही यादी आता २१ व्या वर्षी आहे आणि जगभरात ती खूप शक्तिशाली मानली जाते.
भारतीय वंशाच्या रेश्मा केवलरामणीने स्थान मिळवले
टाईम मॅगझिनच्या यादीत भारतीय नाव नसले तरी, भारतीय वंशाच्या रेश्मा केवलरामणी यांचे नाव प्रभावशाली नेत्यांच्या यादीत समाविष्ट आहे. रेश्मा ही व्हर्टेक्स फार्मास्युटिकल्स नावाच्या एका प्रमुख अमेरिकन बायोटेक कंपनीची पहिली महिला सीईओ आहे. ती ११ वर्षांची असताना अमेरिकेत आली.





