India vs South Africa 4th T20 – बुधवारी झालेल्या तिसऱ्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिका संघाला 11 धावांनी पराभूत करताना, चार दिवसीय टी-20 मालिकेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2-1 अशी महत्वपूर्ण आघाडी घेतली आहे. पहिल्या सामन्यात संजू सॅमसनने तर तिसऱ्या सामन्यात तिलक वर्माच्या धमाकेदार शतकी खेळींच्या जोरावर भारताने या दोन्ही लढती जिंकल्या. मात्र या सर्वामध्ये भारताचा आक्रमक फलंदाज असलेला रिंकू सिंगचा फॉर्म मात्र संघासाठी चिंतेचा विषय झाले आहे. सध्याच्या घडीला भारताकडे 4 सामान्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी असली तरी देखील, ही मालिका जिंकण्याची मोठी जबाबदारी फलंदाजानावर असणार आहे.
मालिका विजयासाठी ‘सूर्या’ उत्सुक
सूर्यकुमारच्या नेतृत्वाखाली भारताने आतापर्यंत 16 पैकी 13 लढती जिंकल्या आहेत. यावेळी देखील भारतीय संघ मालिका जिंकण्याच्या उंबरठ्यावर असून विजय मिळविण्याचे सूर्याचे लक्ष्य असणार आहे. गतवेळी 3 सामान्यांची मालिका भारताने खेळली होती. ही मालिका 1-1 अशी बरोबरीत राहिली होती. त्यातील एक लढत पावसाने वाया गेली होती. गतवर्षी झालेल्या मालिकेत देखील कर्णधार सूर्यकुमार यादवने, शेवटच्या लढतीत शतकी खेळी करताना संघाला विजय मिळवून दिला. 2007 ची विश्वकरंडक स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत झाली होती. पहिला टी-20 विश्वकरंडक जिंकणाऱ्या भारतासाठी वांडरर्स मैदान नेहमीच भाग्यशाली राहिले आहे. भारताने पाकिस्तानला याच मैदानावर पराभूत करताना विश्वकरंडक उंचावला होता.
रिंकूचा फॉर्म ?
टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात आक्रमक असलेल्या फलंदाजांपैकी असलेला रिंकू सिंगचा फॉर्म हा चिंतेचा विषय आहे. रिंकू सिंग, गेल्या काही महिन्यांपासून चांगल्या धावा करू शकलेला नाही. गेल्या अनेक लढतींमध्ये तो सहाव्या किंवा सातव्या क्रमांकावर खेळायला येत आहे. त्यामुळे त्याच्याकडे खेळण्यासाठी जास्त चेंडू शिल्लक राहात नाही. अशा वेळी आक्रमक फटकेबाजी करण्याशिवाय कोणताच पर्याय राहात नाही. पुढील वर्षी भारतामध्ये टी-२० विश्वकरंडक आहे. अशावेळी कर्णधार सूर्यकुमार यादवकडे रिंकूमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी पुरेसा वेळ असणार आहे.
रिंकूची कामगिरी
सध्याच्या मालिकेत रिंकूने दोन सामन्यात सहाव्या तर एका सामन्यात सातव्या स्थानावर फलंदाजी करताना केवळ २८ धावाच केल्या आहेत. तळात खेळात असल्याने ११, ९ किंवा ८ धावा ही चिंतेची बाब नाही, त्याने यासाठी ३४ चेंडूमध्ये या धावा केल्या आहेत, ही चिंतेची बाब आहे. आयपीएल दरम्यान देखील रिंकूने १५ लढतीत ११३ चेंडू खेळले. थोड्याक्यात प्रत्येक लढतीत त्याला केवळ ७.५ चेंडू खेळायला मिळाले. फिनिशर असलेल्या रिंकूला किमान १० चेंडू मिळणे अपेक्षित आहे. यामुळेच समोरच्या संघावर आक्रमण करायचे कि सहाय्यकाची भूमिका करायची यामध्येच तो अडकला असल्याचे दिसून येत आहे.
रिंकूने पाचव्या स्थानावर खेळताना दमदार कामगिरी केली आहे. मात्र संजू सॅमसन सलामीवीर, तिलक वर्मा तिसऱ्या स्थानावावर खेळत असल्याने हार्दिक पंड्यासमोर रिंकूला उतरविणे अवघड आहे. संघाने आतापर्यंत १५ पैकी १२ खेळाडूंना अंतिम ११ मध्ये स्थान दिले आहे. त्यामुळे उद्याच्या सामन्यात कदाचित यश दयाल किंवा विशाख विजयकुमार यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
IND vs SA 1st T20 : टीम इंडियानं डर्बन गाजवलं, पहिल्याच सामन्यात द. आफ्रिकेला 61 धावांनी लोळवलं…
IND vs SA : सामना विनामूल्य कोठे पाहू शकाल….
दोन्ही संघ खालीलप्रमाणे :
भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), रिंकू सिंग, तिलक वर्मा, जितेश शर्मा (यष्टिरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, विजयकुमार विशाक. आवेश खान, यश दयाल.
दक्षिण आफ्रिका : एडन मार्कराम (कर्णधार), ओटनील बार्टमन, गेराल्ड कोएत्झी, डोनोव्हन फरेरा, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅन्सन, हेनरिक क्लासेन, पॅट्रिक क्रुगर, केशव महाराज, डेव्हिड मिलर, मिहलाली मपोंगवाना, नकाबा पीटर, रायन रिकेल्टन, अँडिले सिमेलाब्स, ट्रायबन्स, स्टिलेन्स .