IPL Mega Auction 2025 : आरसीबीने स्वस्तात खरेदी केला स्फोटक फिनिशर, SRHनं थोडक्यात गमावली संधी….

IPL Mega Auction 2025 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने अतिशय स्वस्त दरात स्फोटक अशा फिनिशर फलंदाजाला खरेदी केले आहे. आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात आरसीबीने टीम डेव्हिडला 3 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. यापूर्वी तो मुंबई इंडियन्सचा भाग होता. टीम डेव्हिडची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. त्याने अनेक प्रसंगी दमदार परफॉर्मन्स दिला आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडू टीम डेव्हिडनेही आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे.
Tim David 🤝 @RCBTweets ⚡️⚡️
He’s SOLD for INR 3 Crore 🙌🙌
Huge cheer goes out in the auction arena! 🥳#TATAIPLAuction | #TATAIPL
— IndianPremierLeague (@IPL) November 25, 2024
सनरायझर्स हैदराबादने (SRH) मेगा लिलावात टिम डेव्हिडवर पहिली बोली लावली. यानंतर आरसीबीही या बोलीत सामील झाली. मात्र हैदराबादने 2.80 कोटी रुपयांपर्यंतची शेवटची बोली लावली. यानंतर आरसीबीने बाजी मारली. डेव्हिडने अनेक प्रसंगी मुंबई इंडियन्ससाठी चांगली कामगिरी केली आहे. मात्र लिलावात मुंबईने त्याच्यावर एकदाही बोली लावली नाही.
मानधनामध्ये झाली मोठी घट…
यंदाच्या आयपीएलमध्ये टीम डेव्हिडला मानधनामध्ये मोठे नुकसान झाले आहे. तो 2022 पासून आतापर्यंत मुंबई इंडियन्सचा भाग होता. मुंबई त्याला 8.25 कोटी रुपये मानधन देत होती. त्याला यंदा मात्र आता केवळ तीन कोटी रुपये मानधन म्हणून मिळणार आहेत. टीम डेव्हिडचे आयपीएलचे पहिले मानधन फक्त 20 लाख रुपये इतके होते. त्यावेळी त्याने 2021 मध्ये आरसीबीकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते.
टीम डेव्हिडची आतापर्यंतची कारकिर्द…
टीम डेव्हिडने आतापर्यंत आयपीएलमध्ये 38 सामने खेळले आहेत. या कालावधीत त्याने 46 विकेट घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये टीमची सर्वोत्तम धावसंख्या 46 धावा आहे. त्याने ऑस्ट्रेलियासाठी आतापर्यंत 54 टी-20 सामने खेळले आहेत. या कालावधीत 1201 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्यानं टी-20 मध्ये ऑस्ट्रेलियासाठी 6 अर्धशतके झळकावली आहेत. टीमने 6 एकदिवसीय सामनेही खेळले आहेत. यात तो विशेष काही करू शकलेला नाही.





