IND vs PAK : तिलक वर्माने विराटला मागे टाकत रचला इतिहास! ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिलाच भारतीय

30 सामन्यांनंतर टी-20 मधील सरासरीत तिलक अव्वल –
तिलक वर्माची टी-20 आंतरराष्ट्रीय सरासरी 53.4 आहे, तर विराट कोहलीची 50.7, मनीष पांडे याची 43.1, केएल राहुल याची 41.9 आणि सूर्यकुमार यादव याची 39.0 आहे. गेल्या 13 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये तिलकने 95.5 च्या सरासरीने 500 हून अधिक धावा केल्या आहेत, ज्यामुळे त्याच्या सातत्यपूर्ण शानदार फलंदाजीची पुष्टी होते.
Tilak Varma scored a fantastic unbeaten fifty in the chase to power #TeamIndia to a title triumph 🏆 & bagged the Player of the Match award 👏👏
Scorecard ▶️ https://t.co/0VXKuKPkE2#AsiaCup2025 | #Final pic.twitter.com/17XSNuABmN
— BCCI (@BCCI) September 28, 2025
- तिलक वर्मा: सरासरी 53.4, स्ट्राइक रेट 149
- विराट कोहली: सरासरी 50.7, स्ट्राइक रेट 136
- मनीष पांडे: सरासरी 43.1, स्ट्राइक रेट 126
- केएल राहुल: सरासरी 41.9, स्ट्राइक रेट 145
- सूर्यकुमार यादव: सरासरी 39.0, स्ट्राइक रेट 173
हेही वाचा – भारताच्या विजयानंतर पंतप्रधानांच्या पोस्टवर ख्वाजा आसिफचा संताप ; म्हणाले, “भारत अन् मोदींचा…”
30 पेक्षा जास्त धावांच्या खेळीत रैनाच्या विक्रमाशी बरोबरी –
तिलक वर्माने 30 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 13 वेळा 30 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत, जो सुरेश रैनाच्या विक्रमाशी बरोबरी करणारा आहे. याच बाबतीत विराट कोहलीने 16 वेळा आणि सूर्यकुमार यादवने 14 वेळा 30 पेक्षा जास्त धावांचा स्कोअर केला आहे. या विक्रमाने तिलक हा केवळ युवा खेळाडूच नाही, तर भारतीय संघासाठी विश्वासार्ह फलंदाज असल्याचे सिद्ध केले आहे.
- विराट कोहली: 16
- सूर्यकुमार यादव: 14
- तिलक वर्मा: 13
- सुरेश रैना: 13
हेही वाचा – आशिया कपमध्ये ‘अदृश्य ट्रॉफी’सह सूर्यकुमार यादवचे अनोखे सेलिब्रेशन ; त्याच्या सेलिब्रेशनची सर्वत्र चर्चा
तिलकने संकटात सांभाळली भारताची धुरा –
अंतिम सामन्यात भारताची सुरुवात अत्यंत खराब झाली होती. पहिल्या पाच षटकांत 20 धावांतच तीन गडी बाद झाले. परंतु, तिलकने मोर्चा सांभाळत केवळ धावांचा वेग वाढवला नाही, तर संघाचा आत्मविश्वासही उंचावला. त्याने 53 चेंडूत नाबाद 69 धावा केल्या, तर संजू सॅमसनने 24 धावा आणि शिवम दुबेने 21 चेंडूत 33 धावांची झटपट खेळी करत त्याला उत्तम साथ दिली. या भागीदारीच्या जोरावर भारताने हा सामना 5 गडी राखून जिंकला. या सामन्याचा मानकरी तिलक ठरला, तर मालिकेचा मानकरी अभिषेक शर्मा ठरला.





