Tiger Woods Car Crash | वूड्सच्या प्रकृतीत सुधारणा
Updated On:

लॉस एंजलिस – अमेरिकेचा जागतिक स्टार गोल्फपटू टायगर वुड्स याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. वूड्सच्या दोन्ही पायांना बुधवारी येथे झालेल्या कार अपघातात गंभीर दुखापत झाली आहे. आता शस्त्रक्रियेनंतर वुड्सच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.
रांचो पालोस वेर्डेसजवळ हा अपघात घडला होता. अपघातानंतर त्याला येथील हार्बर-यूसीएलए रुग्णालयात दांखल करण्यात आले होते. त्याचा उजवा पाय आणि घोटयावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून तो उपचारांना प्रतिसाद देत आहे.
कार अपघातातून वूड्स थोडक्यात बचावला
वूड्सची प्रकृती जरी पूर्ण बरी झाली तरीही आगामी काळात त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पायावर शस्त्रक्रिया झाल्यामुळे पुढील किमान सहा ते आठ महिने त्याला गोल्फपासून दूर राहावे लागणार आहे.





