टायगर श्रॉफच्या नव्या चित्रपटाची घोषणा; शेअर केले पोस्टर

Baaghi 4 First Poster | बॉलिवूडचा प्रसिद्ध स्टार अभिनेता टायगर श्रॉफच्या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. नुकताच तो ‘सिंघम अगेन’ चित्रपटात झळकला. यानंतर टायगर श्रॉफची सुपरहिट फ्रँचायझी असलेल्या बागी सिनेमाचा चौथा भाग अर्थात ‘बागी 4’ ची घोषणा करण्यात आली आहे. या सिनेमाचं पोस्टर देखील रिलीज करण्यात आले आहे. पोस्टरसोबतच त्याची रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे.
सोमवारी अभिनेता टायगर श्रॉफने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर ‘बागी 4’ची पहिली झलक दाखवली. त्याने या चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. ज्यामध्ये तो बाथरुममध्ये बसलेला दिसतो, त्याच्या हातात दारूची बाटली, तोंडात सिगारेट आणि हातात रक्ताने माखलेले हत्यार दिसत आहे. तर भिंतीवर रक्ताचे डाग पडलेले दिसतात. त्याच भिंतीवर ‘बागी ४’ ही अक्षरं दिसतात. Baaghi 4 First Poster |
View this post on Instagram
बागी 4 हा या ॲक्शन थ्रिलर फ्रँचायझीच्या शेवटच्या तीन चित्रपटांपेक्षा वेगळा असणार आहे. टायगर श्रॉफने या पोस्टरद्वारे याचे संकेत दिले आहेत. ‘बागी 4’चे हे पोस्टर पाहिल्यानंतर चाहत्यांची उत्कंठा खूपच वाढली असून ते रिलीजसाठी आतुर असल्याचे दिसत आहे. चित्रपटाच्या घोषणेसोबतच त्याची रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे. Baaghi 4 First Poster |
साजिद नाडियादवाला यांनी पुन्हा एकदा ‘बागी 4’च्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे. हा सिनेमा 5 सप्टेंबर 2025 ला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या सिनेमात टायगर श्रॉफसोबत आणखी कोणते कलाकार झळकणार हे मात्र अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.
हेही वाचा:
कैलाश गहलोत भाजपाला साथ देण्याची शक्यता; दिल्ली सरकारवर लावले होते गंभीर आरोप





