मुंबई – टायगर श्रॉफच्या “गणपत’ भाग 1 ची बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू होती. अखेर या सिनेमाची रिलीज डेट जाहीर झाली आहे. स्वतः टायगर श्रॉफने एका ऍक्शन व्हिडीओमधून “गणपत’ची रिलीज डेट जाहीर केली आहे. या व्हिडीओमध्ये टायगरचा एक जबरदस्त डायलॉग आहे.
“अपुन का तो दो बाप है. एक जनता और एक भगवान. दोनोने बोला अपुन को तो अपुन आ रहा है.’असे तो म्हणताना दिसतो आहे. त्याच्या या डायलॉगमुळे “गणपत’चा एकूण मूड कसा असेल याची कल्पना करता येऊ शकेल.
त्याने या व्हिडीओबरोबर सिनेमाचा प्रोमो देखील शेअर केला आहे. “उसकी हटेगी तो सबकी फटेगी, आरहेलाय गणपत, तयार रहनाय’अशी कॅप्शन टायगरने दिली आहे. सर्वात शेवटी चायगरने सिनेमाची रिलीज टडेट घोषित केली आहे.
“गणपत’ 22 डिसेंबर 2022 रोजी रिलीज होणार आहे. “गणपत’मध्ये टायगर श्रॉफबरोबर क्रिती सेनन पुन्हा एकदा दिसणार आहे. “गणपत’च्या पोस्टरमध्ये क्रिती सेनन मोटरसायकलवर बसलेली दिसते आहे.
तिचा एकूण अवतार बघता ती देखील या सिनेमामध्ये टायगरबरोबर दे दणादण हाणामारी करताना दिसणार असा अंदाज आहे.