टायगर श्रॉफ आता डान्स शिकवणार; सुरू केली स्वत:ची अॅकडमी

Tiger Shroff | बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ अभिनयासह त्याच्या डान्स आणि खतरनाक स्टंट्समुळे ओळखला जातो. त्याच्या डान्स मुव्ह्जचे अनेकजण दिवाने आहेत. आता टायगर श्रॉफने स्वतःची पहिली डान्स अॅकडमी सुरू केली आहे. त्यामुळे स्वत: टायगर श्रॉफ आता डान्सचे धडे देणार आहे. याद्वारे त्याने एक नवे पाऊल उचलले आहे.
‘मॅट्रिक्स डान्स अॅकडमी’ असे त्याच्या डान्स अॅकडमीचे नाव आहे. ‘मॅट्रिक्स डान्स अॅकडमी’च्या माध्यमातून टायगर श्रॉफने जॅझ, हिप-हॉप, बॅले आणि इतर अशा विविध नृत्याचे सार देशभरात पसरवणार आहे. टायगर श्रॉफचा उद्देश आहे की त्याच्या अकादमीच्या माध्यमातून कलाकारांना जागतिक दर्जाच्या सूचना, तज्ञांचे मार्गदर्शन आणि स्टेजवर परफॉर्म करण्याची संधी मिळावी.
View this post on Instagram
या उपक्रमाद्वारे टायगरला डान्समध्ये करिअर करू इच्छिणाऱ्यांना प्रेरणा द्यायची आहे. टायगर श्रॉफच्या कारकिर्दीतील हे नवीन पाऊल त्याच्या चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. ‘बागी 4’ मध्ये टायगर पुन्हा एकदा त्याच्या चाहत्यांना प्रभावित करण्यासाठी सज्ज झाला आहे. टायगरची नवीन डान्स अॅकडमी नृत्यविश्वात कशी बदल घडवून आणेल याची त्याचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, टायगर श्रॉफ लवकरच ‘बागी ४’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपुर्वीच त्याचा ‘बडे मियाँ छोटा मियाँ’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. तर त्याआधी ‘गणपत’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. मात्र हे दोन्ही चित्रपट अपयशी ठरले.
हेही वाचा:
बांगलादेश हिंसाचारावर धीरेंद्र शास्त्रींचे मोठे वक्तव्य ; म्हणाले,”त्याठिकाणची परिस्थिती…”





