भिर्रर्रर्रर्र… पोलिसांना गुंगारा देत सरकारच्या नाकावर टिच्चून पडळकरांची बैलगाडा शर्यत पार!

Updated On:

सांगली –  राज्य सरकारनेही लोकभावना ध्यानात घेऊन बैलगाडा शर्यत सुरू होण्यासंदर्भात मार्ग काढला पाहिजे, असे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

राज्यातील शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्या संदर्भात भाजप पक्षाच्या नेत्यांनी गेल्या कित्येक महिन्यांन पासून जोर धरला होता. हा मुद्या अनेक द उपस्थित केला होता. मात्र  बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्या आली नसली तरी भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी बैलगाडा शर्यत भरवून दाखवली आहे.   ही बैलगाडी शर्यत होऊ नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. मात्र पोलिसांना चकवा देत त्यांनी बैलगाडा शर्यत भरवली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, गोपीचंद पडळकर यांनी बैलगाडा शर्यत भरवण्याची प्लॅनींग पूर्वी पासून केली होती. यात  ज्या शेतकऱ्यांची बैल शर्यतीत धावणार होती त्या मोजक्याच शेतकऱ्यांना या शर्यतीच्या ठिकाणाची कल्पना देण्यात आली होती. त्यामुळे रात्री बारा वाजल्यापासून हे शेतकरी शर्यतीच्या मैदानावर माळावर येऊन थांबले होते.  त्यानंतर  सकाळी या ठिकाणाची माहिती काही समर्थकांना देत रानातल्या रस्त्यांनी सगळे शेतकरी शर्यतीच्या ठिकाणी पोहोचले आणि तीन वेळा शर्यतीची बारी भरवण्यात आली.

तत्पूर्वी,  आमदार गोपीचंद पडळकर यांनी 20 ऑगस्ट रोजी बैलगाडा शर्यतीचं आयोजन  करणार असल्याची घोषणा केली होती. त्यांनतर पोलिसांनी आटपाडी तालुक्यातल्या झरे गावात संचारबंदी लागू केली. मात्र ही शर्यत होणारच या विधानावर पडळकर ठाम मत त्यांनी मांडले होते. सरकार तालिबानसारखं वागतंय असंही सांगायला पडळकर विसरले नाहीत.

आणखी संबंधित बातम्या

Nitin Gadkari on Nana Patekar: 'भारतीय चित्रपटसृष्टीची मोठी हानी' ; जवळच्या मित्राच्या निधनाने नितीन गडकरी हळहळले

2026-10-08 09:49:37

Nitin Gadkari on Nana Patekar: 'भारतीय चित्रपटसृष्टीची मोठी हानी' ; जवळच्या मित्राच्या निधनाने नितीन गडकरी हळहळले

Sunetra Pawar on Nana Patekar: "अभिनयाचा एक युगपुरुष हरपला…!" ; अजित पवारांसोबतचा फोटो शेअर करत सुनेत्रा पवारांनी नानांना वाहिली श्रद्धांजली

2026-10-08 09:35:23

Sunetra Pawar on Nana Patekar: "अभिनयाचा एक युगपुरुष हरपला…!" ; अजित पवारांसोबतचा फोटो शेअर करत सुनेत्रा पवारांनी नानांना वाहिली श्रद्धांजली

Pratap Sarnaik : अमराठी चालकांनी मराठी भाषा अभियानात सहभागी व्हावे; मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन

2026-10-06 17:29:48

Pratap Sarnaik : अमराठी चालकांनी मराठी भाषा अभियानात सहभागी व्हावे; मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये कधी जमा होणार? आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होण्याची शक्यता

2026-10-06 11:55:05

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये कधी जमा होणार? आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होण्याची शक्यता

Chandrashekhar Bawankule : "दुष्काळी परिस्थिती गंभीर, कोरोना महामारीपेक्षाही हे मोठे संकट असल्याने उत्सवांवर..."; बावनकुळेंचे आवाहन

2026-10-06 09:38:41

Chandrashekhar Bawankule : "दुष्काळी परिस्थिती गंभीर, कोरोना महामारीपेक्षाही हे मोठे संकट असल्याने उत्सवांवर..."; बावनकुळेंचे आवाहन