आलिया भट्टच्या ‘गंगूबाई’चा तिकीट बारीवर धुमाकूळ; ओपनिंग डेलाच केली तब्बल इतकी कमाई!

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटची मोस्ट अवेटेड फिल्म ‘गंगुबाई काठियावाडी’ हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आहे. 25 फेब्रुवारी 2022 रोजी ‘गंगुबाई…’ मोठ्या पडद्यावर रिलीज रिलीज झाला असून, चित्रपटाने तिकीट बारीवर मोठी कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी चित्रपटाने 14 कोटींचा गल्ला केला. तर, ओपनिंग डेला 10.05 कोटी रुपये कमवले होते.
मिळालेल्या माहिती नुसार आलिया भट्टचा चित्रपट पॅंडेमिक टाइममध्ये तिसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. पहिल्या क्रमांकावर, रोहित शेट्टीचा अक्षय कुमार स्टारर चित्रपट सूर्यवंशी याने 26,29 कोटींची कमाई करून पहिले स्थान मिळवले आहे.
#OneWordReview…#GangubaiKathiawadi: BRILLIANT.
Rating: ⭐️⭐⭐⭐#SLB is a magician, gets it right yet again… Powerful story + terrific moments + bravura performances [#AliaBhatt is beyond fantastic, #AjayDevgn outstanding]… UNMISSABLE. #GangubaiKathiawadiReview pic.twitter.com/pIyaf1MWtv— taran adarsh (@taran_adarsh) February 25, 2022
दुसरा क्रमांक रणवीर सिंहच्या 83 ने 12.64 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्याचवेळी गंगूबाई काठियावाडी आता 10.50 कोटी रुपयांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. गंगुबाईच्या जीवनावरील हा चित्रपट प्रसिद्ध लेखक हुसैन जैदीचे पुस्तक ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ मधील एका प्रकरणातून आकाराला आले आहे.
1960 च्या दशकात मुंबईतील कामाठीपुरा भागातील भागात गंगुबाईचा मोठा दबदबा होता. मुंबईला जाऊन हिरोईन बनण्याचे स्वप्न पाहणारी गंगा, पण हिरोईन बनण्याचे स्वप्न दाखवून गंगासोबत असे काही घडते ज्याचा तिने स्वप्नातही विचार केला नसेल. गंगाचा प्रियकर तिला फक्त काही पैशांसाठी विकतो. मग गंगा गंगूबाई बनून तिच्या आयुष्याला नव्याने सुरुवात करते. या सर्व घटनांवर हा चित्रपट आधारित आहे.





