nagar | तीन पासपोर्ट सायली कुलकर्णी, स्वयंम हांडे व मृदुला डेरे

संगमनेर, (प्रतिनिधी) – डॉ. भानुदास डेरे इंग्लिश मीडीयम स्कूलचा दहावी परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला. प्रथम क्रमांक सायली अमोघ कुलकर्णी १०० टक्के, द्वितीय स्वयंम अशोक हांडे ९६.६० टक्के, तृतीय मृदुला सुनील डेरे ९५ टक्के व चतुर्थ अनुष्का किरण भवर ९४.८० टक्के व पाचवा क्रमांक अवनी कुशावर्त कासट हिने ९४.२० टक्के मिळवले.
त्यामध्ये ९० ते १०० मध्ये १४ विद्यार्थी, ८९ ते ८० टक्केमध्ये २४ विद्यार्थी, ७९ ते ७० टक्केमध्ये ४० विद्यार्थी, ६९ ते ६० टक्केमध्ये ३२ विद्यार्थी, ५९ ते ५० टक्केमध्ये १४ विद्यार्थी व ५० टक्क्यांचा आत ८ विद्यार्थी, अशा एकूण १३२ विद्यार्थ्यानी यश संपादन केले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबददल संस्थेचे अध्यक्ष डॉ. भानुदास डेरे. उपाध्यक्ष ॲड. श्रीराज भानुदास डेरे पाटील, संचालिकाअंकिता श्रीराज डेरे पाटील, सीईओ आशालता शेटटी, प्रभारी प्राचार्या रेखा पवार, उपप्राचार्य स्मिता राजेश गुंजाळ यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
संस्थेच्या उपाध्यक्ष ॲड. श्रीराज डेरे यांनी सांगितले की, राज्यात ज्या पद्धतीने मुलींनी माध्यमिक परीक्षेत भरारी घेतली आहे, त्याचप्रमाणे विद्यालयातून सायली अमोघ कुलकर्णी हिने १०० टक्के घेऊन प्रथम क्रमांक मिळवला आहे. नुकताच बारावी व आता दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे.





