छत्तीसगडमध्ये चकमकीत तीन नक्षलवादी ठार
Updated On:

दंतेवाडा – छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात रविवारी सुरक्षा जवानांशी झालेल्या चकमकीत तीन नक्षलवाद्यांना ठार मारण्यात यश आले आहे.
काटेकल्याण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डब्बाकुन्ना गावाजवळ सुरक्षा कर्मचार्यांचे संयुक्त पथक नक्षलविरोधी मोहिमेसाठी निघाले असताना ही चकमक घडली,
असे पोलीस महानिरीक्षक (बस्तर रेंज) सुंदरराज पी यांनी पीटीआयला सांगितले. या तिघांची ओळख अद्याप पटलेली नसून परिसरात शोधमोहीम सुरू आहे.





