Pune District : कार, दुचाकीच्या अपघातात कुटुंबातील तिघांचा मृत्यू
Updated On:

ओतूर : अहिल्यानगर -कल्याण महामार्गावर सीतेवाडी (ता. जुन्नर) गावच्या हद्दीत सीतेवाडी फाट्याजवळ बुधवारी (दि. 1) दुपारी तीनच्या सुमारास कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात पिंपरीपेंढार (साळशेत, ता. जुन्नर) येथील एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
निलेश ज्ञानेश्वर कुटे (वय 40), जयश्री निलेश कुटे (वय 35), सान्वी निलेश कुटे (वय 14, सर्व रा. पिंपरीपेंढार, साळशेत, ता. जुन्नर) असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
निलेश कुटे हे कुटुंबासह बुधवारी पिंपरीपेंढार येथून दुचाकी (एमएच 05 बीएक्स 4824) वरून कल्याणकडे जात असताना कल्याणकडून अहिल्यानगरकडे येणारी कार (एमएच 16 एटी 0715) यांची समोरासमोर जोरदार धडक होऊन तिघांचा मृत्यू झाला. पुढील तपास ओतूर पोलीस करीत आहेत.





