अकोला – अकोल्यात आज दुपारी झालेल्या दोन दुचाकींच्या धडकेत तीन जणांचा जीव गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा भीषण अपघात तेल्हारा-बेलखेड मार्गावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झाला. या अपघातात दोन्ही दुचाकीवरुन प्रवास करणाऱ्या तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, एकजण गंभीर जखमी असून त्यास तत्काळ उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातील मृतांमध्ये दोन तरुणी आणि एका महिलेचा समावेश आहे. तर, जखमीला तेल्हारा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.