रेल्वेत सापडलं सव्वा तीन कोटींचं घबाड
Updated On:

खांडवा – मुंबईहून वाराणसीकडे जाणाऱ्या दोन प्रवाशांकडे सुमारे सव्वा तीन कोटी रुपयांची रोकड सापडली असून, ती जप्त करण्यात आली आहे. या रेल्वेतून दोन प्रवासी मोठी बेहिशोबी रोकड नेत असल्याची माहिती महसूल गुप्तचर विभागाला मिळाली होती.
त्यानुसार त्यांनी या गाडीतील या संशयितांना खांडवा रेल्वे स्टेशनवर पकडले, त्यावेळी त्यांच्याकडील सामानाची तपासणी केली असता त्यांना ही रोकड आढळून आली. तीन ट्रॉली बॅगमध्ये दोन हजार रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात त्यांच्याकडे ही रोकड होती.
या रकमेविषयी ते काही खात्रीशीर माहिती सांगू शकले नाहीत. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली असून, महसूल गुप्तचर विभागाचे पथक त्यांना पुढील चौकशीसाठी इंदौरला घेऊन गेले आहे.



