Pune District : गुणवडीत कोटीहून अधिक रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन

– ओपन जिम आणि सिंगल फेजच्या विद्युतरोहित्रांचे लोकार्पण
बारामती – तालुक्यातील गुणवडी येथील वॉर्ड क्रमांक एक दत्तवाडी येथे विकास कामांचा धडाका सुरू असून एक कोटीहून अधिक रुपयांची विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व भाजप नेते बाळासाहेब गावडे यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाल्याने गुणवडी गावातील दत्तवाडी येथे १ कोटी रुपये पेक्षा निधी मिळाला. ओपन जिम आणि सिंगल फेजच्या विद्युतरोहित्रांचे लोकार्पण व चार सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
ग्रामपंचायत सदस्य विशाल तुकाराम गावडे व नीलम राजेंद्र शिंदे यांनी पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून घेतला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजय फाळके हे होते. भाजप नेते बाळासाहेब गावडे, भारत गावडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शुभम ठोंबरे, दिलीप शिंदे, कैलास गावडे, ॲड. गुलाबराव गावडे, बाळासो शिंदे, बाळासाहेब बाबुलाल गावडे, महेश चावले, मारुती गावडे, भोलेनाथ खोमणे, संग्राम गावडे, सचिन घाडगे, राजेंद्र शिंदे,सुयश गावडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
फक्त वार्डसाठी नाही तर गावासाठीही निधी उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन बाळासाहेब गावडे यांनी यावेळी दिले. वल्लभ गावडे यांनी बंदिस्त जिमसाठी जिल्हा परिषद शाळेशेजारी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. वल्लभ गावडे यांनी प्रास्ताविक केले. जयवंत गावडे यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी गुणवडी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून गुणवडी ग्रामपंचायतमधील दत्तवाडी वार्डात एक कोटीहून अधिक रुपयांची विकास कामे केली आहेत. गावच्या विकासासाठी इथून पुढील काळात देखील अशाच पद्धतीचे काम करत राहणार.
– विशाल गावडे, नीलम शिंदे,सदस्य, गुणवडी ग्रामपंचायत.





