nagar | सोनसाखळी चोरी करणारे तिघे आरोपी जेरबंद

नगर, (प्रतिनिधी) – नगर शहरासह तालुक्यात चैन स्नेचिंग करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली आहे. त्यांच्याकडून २७ ग्रॅम चे १ लाख ८९ हजारांचे दागिने हस्तगत करण्यात आले असून या तिघांनी नगर शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी चेन स्नेचिंग केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
बिरजा उर्फ बिरजु राजु जाधव (वय -२३, रा. मकासरे चाळ, कायनेटीक चौक, नगर), कृष्णा उर्फ बुट्या मुकेश रनशुर (वय – १९), कुंदन सुंदर उर्फ लक्ष्मण कांबळे (वय -२५, दोघे रा. वाकोडी, ता. जि. नगर), असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.
त्यांच्याकडे त्यांच्याकडे अधिक तपास केला असता आरोपी बिरजा उर्फ बिरजु राजु जाधव याने चोरी केलेले दागिने हे त्याचे नातेवाईकाकडे ठेवले असल्याचे सांगितले. या घटनेतील मुख्य आरोपी बिराज जाधव हा सरराईत गुन्हे गार असून त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात ११ गुन्हे दाखल आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळालेल्या माहितीनुसार हा गुन्हा बिरजा जाधव यांच्या साथीदारांनी मिळून केला आहे. व तो सध्या वाकोडी परिसरात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.
त्यानुसार पथकाने आरोपीस मोठ्या शिताफीने मिळालेल्या माहितीनुसार आरोपीस ताब्यात घेतले. ही कारवाई गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, पोलीस अंमलदार भाऊसाहेब काळे, संदीप पवार, रवींद्र कर्डिले, संतोष लोढे, संतोष खैरे, फुरकान शेख, मयुर गायकवाड, सागर ससाणे, मच्छिंद्र बर्डे, अमृत आढाव, संभाजी कोतकर यांच्या पथकाने केली. आरोपीला पुढील तपासाकामी तोफखाना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.





