मुंबईतील प्रमुख स्थळे बॉम्बने उडवण्याची धमकी; पोलीस सतर्क
Updated On:

मुंबई – मुंबईतील एकाच वेळी अनेक संग्रहालये बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आला आहे. मुंबई पोलिसांना ही धमकी ई-मेलद्वारे आली आहे.
या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस सतर्क झाले असून मुंबई पोलिसांनी बॉम्बशोध पथक या प्रकरणाचा तपास सुरू करत आहे. पोलिसांना आलेल्या ई-मेलमध्ये कुलाब्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय आणि वरळीतील नेहरू सायन्स सेंटरसह प्रमुख संग्रहालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती.
यानंतर कुलाबा, वरळीसह अनेक भागात मुंबई सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला. तसेच धमकीनंतर पोलिसांनी संग्रहालयाची तपासणी केल्यानंतर संशयास्पद कोणतीही आढळून आले नाही. आता मुंबई पोलीस ई-मेल पाठविणा–या व्यक्तीचा शोध घेत आहेत.





