पुणे जिल्हा | तरुणाला कोयत्याने मारण्याची धमकी

वाघोली, (प्रतिनिधी)- आर्थिक व्यवहारातून डॉक्टरसोबत आलेल्या दोघांनी तरुणाच्या कुटुंबाला शिवीगाळ दमदाटी केल्यानंतर दोघांनी तरुणाला रस्त्यात अडवून मारहाण शिवीगाळ केली.
तरुण पोलिसात तक्रार देण्यासाठी आल्यानंतर कोयत्याने मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी डॉक्टर व अन्य दोघांवर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना वाघोली येथे घडली गुरुवारी (दि. 3) सायंकाळी घडली. प्रितेश प्रकाश बाफना (वय 36, रा. वाघोली) असे हल्ला झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी डॉ. विवेक गुप्ता, अजय सावंत, प्रशांत ढमढेरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आर्थिक व्यवहाराच्या वादातून डॉ. गुप्ता हे साथीदारासह बाफना यांच्या घरी गेले. त्यांच्या आई-वडील व पत्नी यांना शिवीगाळ करण्यात आली.
यानंतर दोघांनी बाफना यांच्या कारला आडवी लावून त्यांच्या कारवर दगडफेक केली. तसेच त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ते तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले असता, त्यांना कोयत्याने मारण्याची धमकी दिली.





