Navneet Rana : नवनीत राणांना पुन्हा धमकीचे पत्र; सुरक्षेत केली आणखी वाढ
Updated On:

Navneet Rana – अमरावतीच्या माजी खासदार, भाजप नेत्या नवनीत राणा यांना चार दिवसांतच पुन्हा धमकीचे दुसरे पत्र मिळाले. पूर्वीच्या पत्रात त्यांना सामूहिक अत्याचाराची धमकी देत 10 कोटी खंडणी मागितली होती.
सोमवारच्या पत्रातही पैसे तर द्यावेच लागेल, असा उल्लेख करून आक्षेपार्ह भाषा वापरल्याची माहिती त्यांचे स्वीय सहायक विनोद गुहा यांनी दिली.
या पत्रातही धमकी देणाऱ्याने आपले नाव आमिर असे लिहिले. गुहा यांनी पोलिसात तक्रार देत संरक्षण वाढवण्याची मागणी केली आहे.
राणा यांना सध्या वाय दर्जाची सुरक्षा आहे. त्यांच्या घराभोवतीही सुरक्षा वाढवली आहे. सुरक्षेत आणखी वाढ करू, असे डीसीपी गणेश शिंदे यांनी सांगितले.





