“हजारो महिला लग्न करून पाकिस्तानातून भारतात आल्या, हा मॅरेज जिहाद?”; सदावर्तेंनी व्यक्त केली शंका

Gunaratna Sadavarte | पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे. या हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानातील संबंध ताणले आहे. भारताने पाकिस्तानमधून आलेल्या नागरिकांचे व्हिसा रद्द करून बेकायदेशीरपणे भारतात राहत असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचा आदेश दिला आहे.
भारतात आलेले पाकिस्तानी नागरिक पाकिस्तानात परत जात आहेत. तर पाकिस्तानला गेलेले भारतीय नागरिक हे मायदेशी येत आहेत. विशेष म्हणजे पाकिस्तानमधून भारतात लग्न करून आलेल्या महिलांची संख्या मोठी असल्याचे समोर आलं आहे. Gunaratna Sadavarte |
हा मॅरेज जिहाद असेल तर…
यापार्श्वभूमीवर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी शंका उपस्थित केली आहे. “हजारो लग्न झालेल्या महिला या पाकिस्तानातून भारतात आल्या. हे लक्षात येत असल्याने हा मॅरेज जिहाद आहे का? हे सुद्धा तपासणं जरुरीचं आहे. हा मॅरेज जिहाद असेल तर त्याला प्रेम, लग्न या संकल्पनेत मोडलं जाऊ नये. ही एक दहशतवादी कारवाई आहे. हे एक अंडरवर्ल्ड क्रॉसबॉर्डर टेररिझम आहे. हे टेररिझम ठरवून चाललं आहे. या मॅरेज जिहादला थांबवणं आवश्यक आहे. हे लग्न नसून अतिरेकी कारवाई करण्यासाठीची प्रक्रिया आहे का? हे तपासलं पाहिजे, अशी आमची मागणी आहे’, असंही गुणरत्न सदावर्ते म्हणाले. Gunaratna Sadavarte |
जितेंद्र आव्हाडांवर संतापले
यावेळी गुणरत्न सदावर्ते यांना आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी आव्हाडांवर संताप व्यक्त केला. “जितेंद्र आव्हाड यांनी मॅरेज जिहादवर बोललं पाहिजे. पत्रकारांना भीती घालण्याचं कारण नाही. या देशात मीडिया चौथा स्तंभ आहे. जितेंद्र आव्हाड आमच्या पत्रकारांना भीती घालण्याएवढे तुम्ही मोठे कधी झाला का? ही भीती पत्रकारांना चालत नाही. मॅरेज जिहादवर बोला. पाकिस्तानातून किती आणल्या? त्यांच्यावर कारवाई काय केली, यावर जितेंद्र आव्हाड यांनी बोललं पाहिजे,” असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले. Gunaratna Sadavarte |
“यवतमाळच्या पुसद, उमरेख तालुके किंवा लागून असलेल्या हिंगोली जिल्हा असेल या भागात काही ठिकाणी मदरसे चालू आहेत. कोकणात एका मदरशात ज्या पद्धतीने हत्यार सापडले, मग हे कोणतं शिक्षण आहे? सगळ्या मदरशांबाबत, खासकरुन अतिदुर्गम भागात असणाऱ्या मदरशांमध्ये पिरॉडीकल तपासणी झाली पाहिजे. कारण काश्मीरमध्ये आमच्या हिंदुस्तानी नागरिकांनी जे भोगलं त्याप्रमाणे इंटरनल इनसेक्युरिटी चालू झाली आहे का?” असा सवाल गुणरत्न सदावर्ते यांनी उपस्थित केला. Gunaratna Sadavarte |
शाहरूख खान, सलमान खानसारख्या सेलिब्रिटींनी…
“प्रभू राम, भगवान गौतम बुद्धांचे विचार, भगवान महावीरांचे विचार, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे खुले विचार आहेत. पण इस्लामिक दहशतवाद या नावाखाली काही चाललंय का? किंवा इस्लामिक जग निर्माण करण्यासाठी मदरशांमध्ये काही चाललं का? हे पाहणं महत्त्वाचं आहे. शाहरूख खान, सलमान खानसारख्या सेलिब्रिटींनी सुद्धा आता मदरशांमध्ये काय चाललंय हे गांभीर्याने घेतलं पाहिजे, असेही सदावर्ते यांनी आवाहन केले. Gunaratna Sadavarte |
हेही वाचा:





