satara | प्रहारच्या राज्यव्यापी आंदोलनात हजारो कार्यकर्ते सहभागी होणार

वडूज, (प्रतिनिधी) – प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने छ. संभाजी नगर ( औरंगाबाद ) येथे शुक्रवार दि.९ रोजी होणारया राज्यव्यापी आंदोलनामध्ये माण- खटाव तालुक्यातील हजारो कार्यकर्ते पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष अरविंद पिसे यांच्या नेतृत्वाखाली सहभागी होणार असल्याची माहिती पक्षाचे माण तालुका अध्यक्ष नंदकिशोर पवार व खटाव तालुका अध्यक्ष अक्षय ननावरे यांनी दिली आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आ. बच्चु कडू यांनी राज्यभरातील सर्व दिव्यांगाना आंध्रप्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारनेही प्रतिमहा ६ हजार रुपये पेन्शन दिली जावी, या सह इतर अनेक मागण्या राज्य शासनाकडे केली आहे.
या मागणीची पुर्तता होण्यासाठी शुक्रवार दि. ९ ऑगष्ट रोजी छ. संभाजी नगर याठिकाणी राज्यभरातील दिव्यागांचा व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे, या मेळाव्यासाठीपक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष अरविंद पिसे यांच्या नेतृत्वाखाली हजारो कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
आ. बच्चु कडु यांनी अरविंद पिसे यांचे कार्य पाहूनच राज्यात सर्व प्रथम विधानसभा निवडणुकीसाठी त्यांची उमेदवारी जाहीर केली.
माण – खटावच्या पाणी प्रश्नाची सखोल माहिती असणारे व्यक्तीमत्व अशी अरविंद पिसे यांची ओळख असून सर्वसामान्यांचा आधारवड ठरलेल्या पिसे यांच्या एका आवाहनामुळे हजारो कार्यकर्त्यांनी छ. संभाजीनगर येथे होणारया आंदोलन व मेळाव्यास उपस्थित राहण्याचे ठरवले आहे.





