Satara | लाडक्या बहिणीच्या सुरक्षेसाठी मोर्चा अन् बांगड्यांचा आहेर

वडूज, (प्रतिनिधी) – राज्यात सुरू असलेल्या महिला अत्याचाराविरोधात वडूज येथे शिवसेना ठाकरे गट व मित्रपक्षाच्यावतीने तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
दहिवडी रस्त्यावरील अहिल्यादेवी होळकर चौकापासून मोर्चास प्रारंभ झाला. तहसीलदार कार्यालयासमोर या मोर्चाचे रुपांतर सभेत झाले.
यावेळी बोलताना काँग्रेसचे बाजार समितीचे उपसभापती विजयराव शिंदे, डॉ. महेश गुरव, शिवसेनेचे संतोषभाऊ दुबळे, राष्ट्रवादीचे योगेश जाधव, दाऊद मुल्ला, ‘प्रहार’चे देशमुख यांची मनोगते झाली.
या सर्वांनी राज्यातील वाढत्या महिला अत्याचाराच्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली. त्याचबरोबर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. मोर्चेकऱ्यांनी प्रशासनास बांगड्यांचा आहेर भेट दिला. नायब तहसीलदार दबडे यांनी निवेदन स्वीकारले.
दरम्यान, एसटी स्टॅण्ड चौकात मोर्चा आल्यानंतर शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला. शिवसेना तालुकाप्रमुख शहाजीराजे गोडसे, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या डॉ. प्रियांका काळे, धनाजी काळे, विजयराव शेटे, धनाजी चव्हाण, सुशांत पारलेकर, अजय देवकर, आनंदा साठे,
भगवान मोरे, हणमंत घाडगे, मधुकर मोहिते,लखन पवार,धनाजी गोडसे,आबासाहेब भोसले,अमीन मुल्ला,इम्रान बागवान,राहुल सजगने, कांचन जाधव, सलमा शेख, स्वाती शिंगाडे, रेखा सोनवणे, काजल बुचडे, मनसोरा मुलाणी, विमल शिंदे उपस्थित होते.





