satara | प्रत्येक माणसाने आरोग्याची काळजी घेणे गरजेचे : जाधव

वडूज,(प्रतिनिधी) – धावपळीच्या जीवनात प्रत्येक माणसाने स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे असे मत प्राथमिक शिक्षक समितीचे तालुका अध्यक्ष आबासाहेब जाधव यांनी व्यक्त केले.
खटाव तालुका प्राथमिक शिक्षक समिती व माधवबाग यांचे संयुक्त विद्यमाने वडूज येथे प्राथमिक शिक्षक स्वाध्याय भवन सभागृहात आयोजित सर्व रोग निदान शिबिराचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष नवनाथ जाधव, समितीचे सरिटणीस नितीन घनवट, माजी उपाध्यक्ष कांतआण्णा फडतरे, अरुणराव खाडे,उमेश पाटील, बबनराव डोईफोडे, तुकाराम गायकवाड, सतीश जाधव, राजेंद्र गुरव, अनिल लावंड, सुनिल धर्माधिकारी, हरिश्चंद्र फडतरे, मनिषा जाधव, कविता फडतरे, गोकुळा फडतरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी नवनाथ जाधव, उमेश पाटील, घनवट यांनी माणसाच्या आयुष्यातील आरोग्याचे महत्व तसेच शिक्षक समितीच्या माध्यमातून राबिण्यात येत असलेल्या विविध समाजपयोगी उपक्रमांची माहिती देण्यात आली. माधवबागचे सचिन समिंदर, कमलकांत शेडोकर यांनी उपस्थितांचे रक्त, शुगर, हिमोग्लोबिन, थायरॉईड व इतर प्रकारच्या टेस्ट करण्यासंदर्भात रक्ताचे नमुने घेतले.
बुधवार, दि. १ रोजी ब्लड टेस्ट रिपोर्ट कंन्सल्टिंग, इसीजी, ब्लडप्रेशर, हार्टरेट वैद्यकीय सल्ला व आहार विषयक मार्गदर्शन होणार आहे. या आरोग्य कॅम्पचा लाभ घ्यावा व आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी.असे आवाहन समितीचे अध्यक्ष आबासाहेब जाधव व संयोजकांनी केले आहे.





