Onion Farmers Protest: नाशिकमध्ये कांद्याच्या दरावरुन आंदोलन पेटलं; रोहित पवारांसह दानवे, सपकाळ पोलिसांच्या ताब्यात
Onion Farmers Protest : रोहित पवार, अंबादास दानवेंसह हर्षवर्धन सपकाळ यांनी पोलिसांनी ताब्यात घेतले

Onion Farmers Protest: कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. याप्रकरणी नाशिक जिल्ह्यातील चांदवड चौफुली येथे मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केले.
कांद्याला किमान 24 रुपये हमीभाव मिळावा आणि विकलेल्या कांद्याला 15 रुपये अनुदान मिळावे, या प्रमुख मागण्यांसाठी हा आक्रोश महामोर्चा काढण्यात आला.
या मोर्चात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना नेते अंबादास दानवे, राष्ट्रवादी आमदार रोहित पवार, शशिकांत शिंदे आणि भास्कर भगर, राजाभाऊ वाजे, निलेश लंके यांच्यासह हजारो शेतकरी सहभागी झाले होते. या आंदोलनामुळे महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला.
आंदोलक कार्यकर्ते आणि नेत्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून सरकारविरोधात तीव्र आक्रोश व्यक्त केला आहे. मात्र सकाळपासून सुरू असलेल्या कांद्याच्या दरावरून चांदवडमध्ये आंदोलन चिघळले आहे.
आंदोलनकर्त्यांनी रस्ता रोको करत वाहनांच्या रांगांकडे धाव घेतल्याने तणाव निर्माण झाला. काही आंदोलकांनी वाहनांची हवा सोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी आंदोलकांना मज्जाव करताच दोन्ही बाजूंमध्ये झटापट झाली. तब्बल दोन तासांहून अधिक काळ आंदोलन सुरू असून शेतकरी संतप्त झाले आहेत.
रोहित पवार, अंबादास दानवे, हर्षवर्धन सपकाळ यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र आम्हाला पोलिसांनी जरी ताब्यात घेतलं तरी देखील आम्ही आगेकूच करणारच , असा निर्धार या मोर्चेकरांनी व्यक्त केला.
Vivo Y600 Turbo: ‘व्हिवो Y600 टर्बो’ लॉन्च; एकदा चार्ज करा आणि दोन दिवस टेन्शन फ्री रहा!
काय आहेत मागण्या?
आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली 9.00 वाजता मुंबई-आग्रा महामार्गावर क्रांती महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं होते. तीन हजार रुपये दराने शासकीय कांद्याची खरेदी करा, विक्री झालेल्या कांद्याला पंधराशे रुपये अनुदान द्या, अशा प्रमुख मागण्या शेतकऱ्यांच्या आहेत.
लोकशाहीचा घात – रोहित पवार
“या शासनाचं शेतकऱ्याकडे लक्ष जात नाही. यासाठी आम्ही प्रयत्न करायला गेलो, तर मी असेन, शशिकांत शिंदे असतो, हर्षवर्धन सपकाळ असोत, अंबादास दानवे आहेत, आम्हाला जर अशा पद्धतीने ताब्यात घेतलं असेल तर हा लोकशाहीचा घात आहे. पण हे आंदोलन इथेच संपलं असं नाही, हे वाढवावं लागेल. सामान्य लोक सिस्टीम विरोधात जर उतरले नाहीत, तर हे सरकार त्याच सामान्य लोकांचे हाल करेल,” असे रोहित पवार म्हणाले.
साधारण 6 हजार लोकांना पोलीस प्रशासनाने थांबवले आहे. आंदोलनाला येऊ देत नाही. त्या लोकांना तत्काळ सोडा. सरकार आपल्याला हलक्यात घेत आहे. अजितदादांना या सरकारने न्याय दिला नाही. आम्हाला दुसऱ्या राज्यात जाऊन एफआयआर दाखल करावी लागली. जे अजितदादांना न्याय देत नाही ते आपल्याला कसे देणार? कुंभमेळ्याच्या कामांचे भ्रष्टाचार बाहेर काढणार, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
हेही वाचा:




