पुणे जिल्हा | गड, किल्ल्यावर पर्यटनासाठी येणाऱ्यांनो सावधान

भोर, (प्रतिनिधी) – भोर विधानसभा मतदारसंघातील गड,किल्यांवर पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांनी खबरदारी घ्यावी, अनोळखी ठिकाणी जीवघेणे धाडस करू नये, आपत्तीच्या वेळी स्थानिक मदत घ्यावी, असे आवाहन आमदार संग्राम थोपटे यांनी पर्यटकांना केले आहे.
आमदार संग्राम थोपटे यांनी सोशल मिडियाद्वारे हे आवाहन केले असून त्याचबरोबर मतदार संघातील गडकिल्ल्यांवर मदत कार्य करणाऱ्या स्थानिक नागरिकांचे फोन नंबर्स दिले आहेत. सध्या पावसाळा सुरू असल्याने वर्षाविहार तसेच पर्यटनासाठी गड, किल्ल्यांवर जाणाऱ्या पर्यटकांचा ओघ वाढला आहे.
भोर मतदारसंघातील राजगड, रोहिडेश्वर (विचित्रगड), केंजळगड, राजगड, तोरणा व सिंहगड या ठिकाणी अनेक हौशी पर्यटक येत आहेत. परंतु, अतिवृष्टीमुळे पावसाळ्यात गडांवरील डोंगर भागात दरड कोसळण्याचे प्रमाण अधिक असते. अशावेळी त्यांच्यावर आपत्कालीन परिस्थिती ओढवण्याची शक्यता असते.
त्यातून सुरक्षित बाहेर पडण्यासाठी स्थानिक नागरिकांकडून मदत मिळण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून केल्याचे आमदार संग्राम थोपटे यांनी सोशल मिडियावर पोस्ट केले आहे.
मदतीसाठी क्रमांक
राजगड – विशाल पिलावरे ९०८२७५९७८१, अशोक कचरे ९०६७३३६८९४, बापू साबळे ७५१७०२४६८१. रायरेश्वर – अनिल जंगम ८७८८१३८६८८, तानाजी जंगम ८६८९९६६६७२. केंजळगड – सागर पाकिरे ९०४९०६२०७३०. रोहिडेश्वर (विचित्रगड) – घनश्याम ९३७०५७३८७७, शंकर ढवळे ९३७३६४३५६१.
सिंहगड – अॅड मारुती गोळे ९२८४४७४०३९, अमोल पांढरे ९९२१६९९६९८, प्रकाश केदारी ९८५०८९२७२१, किरणकुमार पाटील ९९२२९२२२९३, दत्ता जोरकर ७९७२३२२८८५. तोरणा – ज्ञानेश्वर वेगरे ७५०७०४३८७२, रामभाऊ राजीवडे ७७५६८००७१२, गोटू गाडे ९२८४६४५७५४, संतोष बोरणे ८६५७७६२४२४, अमर भोंडेकर ८०५५५७९०१३, शुभम बोराणे ९७६७४११३७३.





