Kirit Somaiya : वाघ बनून बसलेले…कोल्ह्यासारखे पळाले! ठाकरे गटाकडून किरीट सोमय्यांचा व्हिडिओ ट्वीट
Kirit Somaiya : या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी यांच्याकडून बैठकांचा सिलसिला सुरू आहे.

Kirit Somaiya : भाजप नेते किरीट सोमय्या हे विविध मुद्द्यांवरून सातत्याने चर्चेत असतात. विशेषतः देशातील बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांविरोधात त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेच्या विविध बैठकींमध्ये त्यांच्या उपस्थितीवरून आता राजकीय वाद रंगला असून, याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
या व्हिडिओत बिनपदाचे ‘सुपर महापौर’! असे म्हणत किरीट सोमय्या यांच्यावर जोरादार निशाणा साधण्यात आला आहे. किरीट सोमय्या यांच्याकडे सध्या भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष हे पद आहे. ते मुंबई ईशान्य या भागातून खासदारही राहिलेले आहेत. याव्यक्तरिक्त त्यांची भाजपचा ज्येष्ठ नेता म्हणूनही ओळख आहे.
भाजपकडे मुंबई महापालिकेचा कारभार गेल्यानंतर विविध निर्णय घेण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी यांच्याकडून बैठकांचा सिलसिला सुरू आहे. यातील अनेक बैठकींना किरीट सोमय्या सहभाग घेत असून ना निवडणूक लढवली ना जनतेने निवडलं ना कोणतं अधिकृत पद, तरीही महापौर आणि उपमहापौरांच्या बैठकीत ठाण मांडून बसतात आणि सूचना देतात, असा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.
अशाच एका बैठकीदरम्यानचा एक व्हिडिओ ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओसोबत त्यांनी किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार टीका केली आहे. या टीकेनंतर आता राजकारण तापणार असून, या टीकेला किरीट सोमय्या काय प्रत्युत्तर देणार याकडे अनेकांचे लक्ष लागलेले आहे.
अखिल चित्रे यांची पोस्ट
बिनपदाचे ‘सुपर महापौर’!
मुंबईत एक नवीन पद निर्माण झालंय –
‘बिनपदाचे सुपर महापौर’ – नाव: किरीट सोमय्या!
ना निवडणूक लढवली
ना जनतेने निवडलं
ना कोणतं अधिकृत पद ; तरीही महापौर आणि उपमहापौरांच्या बैठकीत ठाण मांडून बसतात आणि सूचना देतात!
काम काय? तर,महापौरांच्या खुर्चीशेजारी बसणं, बैठकीत सगळ्यात जास्त बोलणं,पडद्यामागून सूत्र हलवणं आणि जेव्हा मीडियाने जाब विचारला त्याची जागा दाखवली तेव्हा ‘सुपर महापौर’ साहेबांनी काय केलं?
चक्क उठून निघून गेले!
वाघ बनून बसलेले … कोल्ह्यासारखे पळाले!
बिनपदाचे ‘सुपर महापौर’!
मुंबईत एक नवीन पद निर्माण झालंय –
‘बिनपदाचे सुपर महापौर’ – नाव: किरीट सोमय्या!ना निवडणूक लढवली
ना जनतेने निवडलं
ना कोणतं अधिकृत पद ; तरीही महापौर आणि उपमहापौरांच्या बैठकीत ठाण मांडून बसतात आणि सूचना देतात!
काम काय? तर,महापौरांच्या खुर्चीशेजारी बसणं,… pic.twitter.com/Kk9vpIJe9U— Akhil Chitre अखिल चित्रे (@akhil1485) June 11, 2026






