इंदुरीकर महाराजांचे ते व्हिडिओ पुन्हा तपासले जाणार 

Updated On:
इंदुरीकर महाराजांचे ते व्हिडिओ पुन्हा तपासले जाणार 

नगर  – इंदूुरीकर महाराज यांचे कीर्तन असणारे काही व्हिडिओ अंधश्रध्दा निर्मूलन समितीने जिल्हा रूग्णालयाच्या पीसीएनडीटी सल्लागार समितीला दिले आहेत. सदर व्हिडिओ ही समिती तपासण्यासाठी सायबर पोलीसांकडे देणार आहे. यात जर वादग्रस्त वक्‍तव्य आढळले तर महाराज पुन्हा अडचणीत येवू शकतात.

महाराजांनी संतती नियमनाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ एका पेन ड्राइव्हमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जिल्हा रुग्णालयाच्या पीसीएनडीटी सल्लागार समितीला दिला आहे. यापूर्वी जे व्हिडिओ सायबर सेलच्या माध्यमातून पीसीपीएनडीटी समितीने तपासून घेतले होते.त्यात काही अक्षेपार्ह आढळले नव्हते.

मात्र याला अंधश्रध्दा निर्मूलन समितीने आक्षेप घेत नव्याने काही व्हिडिओ दिले आहेत. व इंदोरीकरांविरोधातील कारवाई करण्याची मागणी केली होती. या संदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात पीसीएनडीटी समितीची बैठक होऊन या बैठकीमध्ये इंदोरीकर महाराज यांना देण्यात आलेली नोटीस व महाराजांनी दिलेला खुलासा यावर चर्चा झाली. तसेच या प्रकरणासंदर्भात अंनिसने दिलेल्या पुराव्यांवरही चर्चा झाली. यावेळी इंदोरीकर यांचे कीर्तन असणारे काही व्हिडिओ एका पेन ड्राईव्हमध्ये अंनिसने समितीला दिले असल्याचा मुद्दा समोर आला.

आणखी संबंधित बातम्या

अहमदनगर : सावकाराच्या त्रासाला कंटाळून एकाची आत्महत्या ; तीन सावकारांवर गुन्हा दाखल

2024-10-15 11:39:50

अहमदनगर : सावकाराच्या त्रासाला कंटाळून एकाची आत्महत्या ; तीन सावकारांवर गुन्हा दाखल

पित्याच्या स्मृतीत मुलाकडून नवरात्रीत ४०० महिलांसाठी मोफत देवी दर्शन यात्रा

2024-10-11 15:55:44

पित्याच्या स्मृतीत मुलाकडून नवरात्रीत ४०० महिलांसाठी मोफत देवी दर्शन यात्रा

नेवाशात शंकरराव गडाख विरुद्ध प्रभाकर शिंदे यांच्यात लढत?

2024-10-11 15:41:59

नेवाशात शंकरराव गडाख विरुद्ध प्रभाकर शिंदे यांच्यात लढत?

Lok Sabha Election 2024 : इंग्रजी बोलून दाखवा म्हणणाऱ्या विखेंना निलेश लंकेचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले...

2024-04-03 18:12:06

Lok Sabha Election 2024 : इंग्रजी बोलून दाखवा म्हणणाऱ्या विखेंना निलेश लंकेचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले...

अहमदनगर - पोलीस निरीक्षकांच्या दालनातच पिला औषध

2024-02-02 08:29:21

अहमदनगर -  पोलीस निरीक्षकांच्या दालनातच पिला औषध