यंदाचा पत्रकार दिनू रणदिवे स्मृती पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार मधु कांबळे यांना जाहीर
Updated On:

मुंबई : ख्यातनाम पत्रकार, स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील एक आघाडीचे शिलेदार आणि भारताच्या समाजवादी चळवळीतील ध्येयवादी कार्यकर्ते दिवंगत दिनू रणदिवे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षी दिला जाणारा ‘पत्रकार दिनू रणदिवे स्मृती पुरस्कार’ यावर्षी ज्येष्ठ पत्रकार मधु कांबळे यांना जाहीर झाला आहे.
‘पत्रकार दिनू रणदिवे स्मृती पारितोषिक समितीतर्फे येत्या 19 जुलै 2024 रोजी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात सायंकाळी 5.30 वाजता पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यसभेचे माजी सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर असतील.





