ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांना यंदाचा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली : ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान (Waheeda Rehman) यांची यंदाच्या दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी ही माहिती दिली आहे. वहिदा रेहमान यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल यावर्षीचा प्रतिष्ठित दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. हे जाहीर करताना खूप आनंद होत असल्याची भावना अनुराग ठाकूर यांनी ट्वीटद्वारे केली आहे.
I feel an immense sense of happiness and honour in announcing that Waheeda Rehman ji is being bestowed with the prestigious Dadasaheb Phalke Lifetime Achievement Award this year for her stellar contribution to Indian Cinema.
Waheeda ji has been critically acclaimed for her…
— Anurag Thakur (@ianuragthakur) September 26, 2023
वहिदा यांच्या कामगिरीचे अनुराग ठाकूर यांनी कौतुक करत एक लांबलचक पोस्ट शेअर केली आहे. अनुराग ठाकूर यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले की, “हिंदी चित्रपटांमधील भूमिकांसाठी वहिदा जी यांची नेहमीच समीक्षकांनी प्रशंसा केली आहे, त्यापैकी काही महत्त्वाचे सिनेमे म्हणजे ‘प्यासा’, ‘कागज के फूल’, ‘चौधवी का चाँद’, ‘साहेब बीवी और गुलाम’, ‘गाइड’, ‘खामोशी’ यासारखे अनेक चित्रपट आहेत.
“त्यांना रेश्मा आणि शेरा या चित्रपटातील भूमिकांसाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कारप्राप्त वहिदा जी यांनी भारतीय नारीचे समर्पण, वचनबद्धता आणि सामर्थ्याचे उदाहरण दिले आहे, जी तिच्या कठोर परिश्रमाने व्यावसायिक उत्कृष्टतेची सर्वोच्च पातळी गाठू शकते.” मागील वर्षी ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. यंदा वहिदा रहमान यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे.





