Revenue : पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागात २०२५-२६ या आर्थिक वर्षात आतापर्यंत ५ लाख ३३ हजार ६७3 दस्तनोंदणी झाली असून, त्यामधून १२ हजार ५७६ कोटींचा महसूल शासनाला मिळाला आहे. मार्चअखेरमुळे आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यास नागरिक प्राधान्य देतात आणि रेडी रेकनरमध्ये वाढ होण्याच्या शक्यतेने पुढील १५ दिवसांत दस्तनोंदणी आणि महसुलात आणखी वाढ होणार आहे. दि. १ एप्रिल २०२५ ते दि. ९ मार्च २०२६ पर्यंत पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात मिळून २ लाख ९७ हजार ४३४ दस्तांची नोंदणी झाली आहे. यामध्ये जमीन, सदनिका, दुकाने आदींसह भाडेकरार आदी दस्तांचा समावेश आहे. या दस्तनोंदणीतून सुमारे १० हजार कोटींचा महसूल मिळाला आहे, तर २०२५ -२६ या आर्थिक वर्षात पुणे मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयास ११ हजार ७५० कोटींचा महसूल जमा करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मागील आर्थिक वर्षात म्हणजे २०२४-२५ या आर्थिक वर्षात पुणे, पिंंपरी- चिंचवड शहरातून १० हजार ५७६ कोटींचा महसूल मिळाला होता, तर २ लाख ८६ हजार ३३७ दस्तनोंदणी झाली होती. याशिवाय पुणे ग्रामीण मधून यंदा २ लाख ३६ हजार २३९ दस्तांची नोंदणी झाली असून, यामधून २ हजार ५७६ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. मागील आर्थिक वर्षात ग्रामीण भागातून २ हजार ५७६ कोटींचा महसूल मिळाला होता, तर २ लाख ७२ हजार ३४८ दस्तांची नोंदणी झाली होती. १ एप्रिलपासून रेडी रेकनरच्या दरात वाढ होण्याची शक्यता असल्याने, वाढीव मुद्रांक शुल्क टाळण्यासाठी नागरिक आताच दस्तनोंदणीसाठी गर्दी करत आहेत. पुढील १५ दिवसांत दस्तनोंदणी कार्यालयात गर्दी राहण्याची शक्यता असून, दस्तनोंदणीमध्ये वाढ होण्याची शक्यता नोंदणी विभागातील अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. Gas Shortage: सिलिंडरसाठी रांगा लागल्या नाहीत, ऑनलाइन बुकिंगद्वारेच पुरवठा; जिल्हाधिकारी डुडी यांची माहिती