Ghabadkund movie : मराठी चित्रपटसृष्टीत आता नवीन विषयांसोबतच चित्रपटाच्या भव्यतेबाबत विचार केला जात आहे. मराठी चित्रपटात आशयघन विषय हाताळले जात आले आहेतच; पण याबरोबरच चित्रपटाच्या कथानकानुसार त्याची तशाच प्रकारची उत्तम निर्मिती कशी केली जाईल, याच्यावर भर दिला जात आहे. याचे ताजे उदाहरण द्यायचे झाल्यास घबाडकुंड हा चित्रपट. मराठीत पहिल्यांदाच मोठ्या स्केलवर हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. बरीच चर्चा या चित्रपटाची होत असून आता घुबाडकुंडचा फर्स्ट लूक व्हिडिओ रिलीज करण्यात आला आहे. Ghabadkund movie चित्रपटाचे कथानक आपल्याला एका रहस्यमय जगात घेऊन जात असल्याचे फर्स्ट लूकच्या व्हिडिओवरुन दिसत आहे. घुबाडकुंडचे एक युनीव्हर्स आहे. या युनीव्हर्सची एक छोटशी झलक फर्स्ट लूकच्या व्हिडिओवरुन दाखविण्यात आली आहे. यावरून चित्रपटाची कथा रहस्यमय, थरारक असल्याचे दिसते. चित्रपटात मोठी स्टारकास्ट आहे. व्हिडिओत या स्टार कास्टमधील काही कलाकरांची झलक दाखवण्यात आली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक प्रीतम एस. के. पाटील यांनी केले असून, हा चित्रपट १९ जून २०२६ या दिवशी रिलीज होणार आहे. देवदत्त नागे, संदीप पाठक, कुशल बद्रिके शशांक शेंडे, प्राजक्ता हनमघर, स्मिता पायगुडे-अंजुटे या कलाकारांची झलक व्हिडिओत बघायला मिळत आहे. Ghabadkund movie ‘घबाडकुंड’साठी प्रचंड मेहनत घेण्यात आली आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी पुण्याजवळील खेड-शिवापूर येथे तब्बल १२ हजार स्क्वेअर फुटांवर भव्यदिव्य सेट उभारण्यात आले. या सेटमध्ये पाण्याची कुंड, खोल विहिरी, पुरातन मंदिरे, गुहा व गुप्त मार्ग यांचा समावेश असून रहस्यमय वातावरणाची निर्मिती करण्यात आली. GhabadkundGhabadkund Marathi Movie या चित्रपटात अॅक्शन, थरार, विनोद आणि नातेसंबंधांची गुंतागुंत बघायला मिळणार आहे. ‘अल्याड पल्याड’च्या यशानंतर दिग्दर्शक प्रीतम एस. के. पाटील यांचा हा नवा बिगबजेट चित्रपट आहे. निर्माते रसिक कदम असून सहनिर्मिती स्मिता पायगुडे-अंजुटे यांची आहे. विशेष म्हणजे ‘घबाडकुंड’ हा चित्रपट फक्त मराठीतच नव्हे तर हिंदी आणि तेलगू भाषेतही प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे आता १९ जूनला हा चित्रपट बॅाक्स अॅाफिसवर रिलीज झाल्यानंतर कसा प्रतिसाद प्रेक्षक देणार याकडे लक्ष असणार आहे. हेही वाचा : Alia Bhatt: महिला दिनी आलिया भट्टला मिळाले खास गिफ्ट; मुलगी राहा आणि रणबीर कपूरने दिले गोड सरप्राईज!