Maharashtra Politics : मोठी बातमी..! भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याची पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी; महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
Maharashtra Politics : डॉ. हिना गावितांविरोधातील कथित वादग्रस्त ऑडिओ क्लिप प्रकरणी भाजपचे माजी महामंत्री विजय चौधरी यांची पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली आहे.

Maharashtra Politics : नंदुरबार जिल्ह्यातील भाजपमधील अंतर्गत वाद आता चांगलाच चिघळला आहे. पक्षातील वादग्रस्त ऑडिओ क्लिप प्रकरणाची गंभीर दखल घेत भाजपचे माजी महामंत्री विजय चौधरी यांची पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली आहे. या कारवाईमुळे उत्तर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. (Maharashtra Politics)
हिना गावितांविरोधातील ऑडिओ क्लिप ठरली कारणीभूत?
काही दिवसांपूर्वी भाजपच्या माजी खासदार हिना गावित यांच्याविरोधातील कथित वादग्रस्त ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. ही क्लिप विजय चौधरी यांची असल्याचा दावा करण्यात आला होता. या प्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या ऑडिओ क्लिपमधील कथित वक्तव्यांमुळे पक्षांतर्गत राजकारण आणि स्थानिक नेत्यांमधील मतभेद पुन्हा चर्चेत आले. (Maharashtra Politics)
पक्षाने घेतला कठोर निर्णय
या प्रकरणाची गंभीर दखल घेत भाजपने चौधरी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली आहे. पक्षाने जारी केलेल्या पत्रकानुसार, विजय चौधरी यांना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व जबाबदाऱ्यांतून तात्काळ मुक्त करण्यात आले आहे. या कारवाईमुळे नंदुरबार भाजपमधील अंतर्गत संघर्षाला आता वेगळे वळण मिळाले आहे. (Maharashtra Politics)
भाजपकडून डॅमेज कंट्रोल सुरू
या घडामोडीनंतर भाजप प्रदेश नेतृत्वाने नंदुरबारमधील परिस्थितीचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. प्रदेश कार्यालयात नंदुरबार कोअर कमिटीची तातडीची बैठक घेण्यात आल्याचे समोर आले आहे. (Maharashtra Politics)

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेत असल्याचे सांगितले जात आहे. स्थानिक पातळीवरील गटबाजी आणि मतभेद नियंत्रणात आणण्याचे आव्हान भाजप नेतृत्वासमोर आहे. (Maharashtra Politics)
नंदुरबारमधील अंतर्गत संघर्षाचा आगामी राजकारणावर काय परिणाम होणार आणि चौधरींच्या हकालपट्टीनंतर स्थानिक भाजपमध्ये कोणती नवी राजकीय समीकरणे तयार होणार, याकडे आता लक्ष लागले आहे. (Maharashtra Politics)




