Maharashtra Politics : एकनाथ शिंदेसह राष्ट्रवादीला भाजपचा दे धक्का; पुण्यातील 3 बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश; राजकीय वर्तुळात खळबळ
Maharashtra Politics : पुण्यात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत प्रमोद निम्हण, प्रल्हाद गवळी आणि वैष्णवी किरड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

Maharashtra Politics : पुणे शहराच्या राजकारणात भाजपने मोठी खेळी केली आहे. सध्या कोणतीही निवडणूक नसतानाही राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक प्रमोद निम्हण, मनसेचे माजी शहर संघटक प्रल्हाद गवळी आणि शिवसेना शिंदे गटाच्या महिला पदाधिकारी वैष्णवी किरड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पुणे शहर भाजप कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. (Maharashtra Politics)
या तिन्ही नेत्यांच्या प्रवेशामुळे पुणे शहरातील राजकीय समीकरणांबाबत चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे आगामी निवडणुका नसताना भाजपने केलेल्या या पक्षप्रवेशामुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत. (Maharashtra Politics)
राष्ट्रवादीला धक्का; प्रमोद निम्हण भाजपमध्ये
प्रमोद निम्हण हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक असून, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू म्हणून त्यांची ओळख होती. पुणे महापालिका निवडणुकीपूर्वी त्यांच्या नेतृत्वाखाली प्रभागात पॅनेल उभारण्याच्या हालचाली सुरू होत्या. मात्र, ऐनवेळी पक्षाने त्यांना उमेदवारी न देता बाबुराव चांदेरे यांना संधी दिली. (Maharashtra Politics)
यामुळे निम्हण समर्थकांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. त्यानंतर निम्हण यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. ‘शिट्टी’ या चिन्हावर त्यांनी निवडणूक लढवली असली तरी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. (Maharashtra Politics)
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर निम्हण यांनी, “प्रभागाचा विकास व्हावा म्हणून भाजपमध्ये प्रवेश केला. आता परिसरातील विकासकामांना गती मिळेल,” अशी भूमिका मांडली. (Maharashtra Politics)
मनसेला रामराम; प्रल्हाद गवळींचा भाजपमध्ये प्रवेश
रविवार पेठ आणि नाना पेठ परिसरात सामाजिक कामासाठी परिचित असलेले प्रल्हाद गवळी यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. गवळी यांच्या ‘मित्र परिवार’कडून दरवर्षी गणेशोत्सवात विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. (Maharashtra Politics)
गवळी यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी २०२३ मध्ये त्यांच्या परिसरातील उपक्रमाला भेटही दिली होती. मात्र, आता गवळी यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. (Maharashtra Politics)
“समाजात अधिक चांगल्या पद्धतीने काम करता यावे म्हणून भाजपचे कमळ हाती घेतले आहे. माझा निर्णय मी घेतला असून मनसेमध्ये याबाबत कोणालाही सांगितले नाही,” असे गवळी यांनी स्पष्ट केले. (Maharashtra Politics)
शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याही भाजपमध्ये
शिवसेना शिंदे गटाच्या महिला पदाधिकारी वैष्णवी किरड यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. यापूर्वी त्यांनी काँग्रेस आणि त्यानंतर शिवसेनेत काम केले आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर किरड यांनी भाजप हा मोठा राष्ट्रीय पक्ष असून, कोणाशीही आपली स्पर्धा नसल्याचे सांगितले. (Maharashtra Politics)
निवडणुका नसतानाही भाजपची जोरदार मोर्चेबांधणी
एकाच दिवशी राष्ट्रवादी, मनसे आणि शिवसेना शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांना भाजपमध्ये आणण्यात आल्याने पुणे शहराच्या राजकारणात या ‘ट्रिपल स्ट्रोक’ची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. निवडणुका नसतानाही भाजपकडून सुरू असलेली संघटनात्मक बांधणी आगामी राजकीय समीकरणांसाठी महत्त्वाची ठरणार का? याकडे आता लक्ष लागले आहे. (Maharashtra Politics)






