रणवीर सिंहच्या जागी ‘डॉन ३’मध्ये दिसणार ‘हा’ लोकप्रिय अभिनेता?

Don 3 Film | अभिनेता रणवीर सिंह ‘डॉन ३’ मधून बाहेर पडला आहे. धुरंधरच्या प्रचंड यशामुळे त्याने ‘डॉन ३’ सोडल्याचे मानले जात आहे. यानंतर आता फरहान अख्तर नव्या चेहऱ्याच्या शोधात आहे.
डॉन ३ चे निर्माते तातडीने रणवीर सिंगची रिप्लेस्मेंट शोधण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांनी अभिनेता हृतिक रोशनचाही विचार केल्याचे म्हंटले जात आहे. फरहानने हृतिकसोबत याबाबत चर्चा केल्याचेही म्हंटले जात आहे.
याआधीही ऋतिकला ‘डॉन’साठी पसंती दिली गेली होती. पण फरहान अख्तरच्या पहिल्या पसंती असूनही चित्रपट शाहरुख खानच्या हाती लागला होता. आता १९ वर्षांनंतर पुन्हा ऋतिकच्या नावाची चर्चा होत आहे. ऋतिकने यापूर्वी धूम २ सारख्या चित्रपटांमध्ये भूमिका केली आहे. पण, वॉर २ फेम अभिनेता त्याचा जवळचा मित्र फरहान अख्तरच्या आगामी डॉन ३ मध्ये मुख्य भूमिका साकारेल की नाही हे अद्याप निश्चित झालेले नाही. Don 3 Film |
View this post on Instagram
सध्या सोशल मीडियावर फरहान अख्तरने डॉन ३ साठी ऋतिक रोशनला कास्ट केल्याची बातमी तुफान व्हायरल होत आहे. काही म्हणतात की ते अजून यावर चर्चा करत आहेत. काहींचं म्हणणं आहे की त्यांना त्यांचा नवा डॉन सापडला आहे. रिपोर्ट्सनुसार, इंडस्ट्रीचे ‘ग्रीक गॉड’ म्हणून ओळखले जाणारे ऋतिक रोशन या भूमिकेसाठी परफेक्ट चॉइस आहेत. आता डॉन ३ मध्ये ऋतिक रोशन दिसतील की नाही हे तर येणारा वेळच सांगेल. Don 3 Film |
डॉन फ्रँचायझीच्या मागील दोन भागांमध्ये मेगा सुपरस्टार शाहरुख खानने डॉनची भूमिका साकारली होती. पण, त्याऐवजी रणवीर सिंगला डॉन ३ मध्ये कास्ट केले गेले होते, मात्र आता रणवीरनेही हा चित्रपट सोडला आहे. याआधी अभिनेत्री कियारा अडवाणीने यापूर्वी गरोदरपणामुळे डॉन ३ मधून बाहेर पडून प्रमुख फ्रँचायझी सोडली होती. Don 3 Film |
हेही वाचा :





