पुणे जिल्हा | भारत देश विश्वगुरुपदी विराजमान व्हावा, हाच ध्यास

मंचर, (प्रतिनिधी) – आगामी काळात संघाला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. संघशताब्दीच्या निमित्ताने संघकार्याचा विस्तार हा सर्वस्पर्शी- सर्वसमावेशक होणे अपेक्षित आहे. संपूर्ण समाज समरस व्हावा, हा देश विश्वगुरुपदी विराजमान व्हावा, यासाठीच हिंदू समाजाचे संघटन राष्ट्रीय स्वंसेवक संघ अविरतपणे करत आहे, असे प्रतिपादन जिल्हा सहकार्यवाह अभिजित शिंदे यांनी केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सघोष पथसंचलन दरवर्षीप्रमाणे शस्त्रपूजन आणि सघोष पथसंचलन मंचर (ता.आंबेगाव) येथे संपन्न झाले. कार्यक्रमप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे जिल्हा संघचालक डॉ. भास्करराव भोसले, जिल्हा सहकार्यवाह अभिजीत शिंदे,
प्रमुख पाहुणे ह.भ.प. नामदेव महाराज वाळके, तालुका संघचालक संजय बाजारे, तालुका कार्यवाह सचिन पवळे, तालुका घोष प्रमुख जितेंद्र निळकंठ, जेष्ठ नेते कैलास राजगुरव,
कार्यालयीन प्रमुख हर्षल डावखरे, राजेश पटेल, अक्षय भालेराव, यतिन कुलकर्णी, सचिन तागड, जितेंद्र त्रिवेदी, संतोष गुळवे, योगेश मोरडे, कुणाल घुले, चेतन उदावंत, महेश पिंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आंबेगाव तालुक्याच्या वतीने शस्त्रपूजन आणि सघोष पथसंचलन पार पडले. पथसंचलनाची सुरुवात मंचर नगरीचे ग्रामदैवत श्रीभैरवनाथ मंदिर येथील पटांगन येथून झाले.
संचलनमार्ग- भैरवनाथ मंदिर-चावडी चौक- छत्रपती संभाजी महाराज चौक – पिंपळगाव फाटा-मूळेवाडी रस्ता – बागल मळा – छत्रपती शिवाजी महाराज चौक – चौंडेश्वरी मंदिर- श्रीराम मंदिर मार्गे भैरवनाथ मंदिर या ठिकाणी शस्त्रपूजनाने संचलनाचा समारोप झाला.





