“योजना बंद करणारे हे चालू सरकार” ; अंबादास दानवेंची टीका, ट्वीट करत घेतला समाचार; ‘त्या’ योजनांची यादीच दाखवली

Ambadas Danve : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना त्यांच्या कार्यकाळात सुरू झालेल्या अनेक योजना बंद करण्याचा घाट घातला जात असल्याची जोरदार चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे. आनंदाचा शिधा या योजनेनंतर आता आणखी एका योजनेच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. माझी शाळा ही योजना बंद पडण्याच्या मार्गावर असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यावर आता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी सरकावर संताप व्यक्त करत जोरदार निशाणा साधला आहे. योजना बंद करणारे हे चालू सरकार आहे, निवडणुकांपुरत्या या सगळ्या योजनांचा भंपकपणा जनतेपुढे निश्चित मांडू, असे दानवे यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरून ट्वीट करत म्हटले आहे. एवढेच नाही तर अंबादास दानवेंनी कोणत्या योजना बंद आहेत त्याची यादीच शेअर केली आहे.
सामान्यांना कणभर लाभाची अपेक्षा असलेल्या योजना बंद करून देवेंद्र फडणवीस सरकारने आपल्याच सहकाऱ्यांच्या निर्णयांवर फुल्या मारल्या आहेत. अमच्यातून गेलेले ‘कटप्रमुख’ मात्र यावर शब्द न बोलता महाशक्तीच्या लाडक्या बुलेट ट्रेनची री ओढताना आपल्याला दिसतील, अशी टीका त्यांनी केली आहे.
सामान्यांना कणभर लाभाची अपेक्षा असलेल्या योजना बंद करून देवेंद्र फडणवीस सरकारने आपल्याच सहकाऱ्यांच्या निर्णयांवर फुल्या मारल्या आहेत. अमच्यातून गेलेले ‘कटप्रमुख’ मात्र यावर शब्द न बोलता महाशक्तीच्या लाडक्या बुलेट ट्रेनची री ओढताना आपल्याला दिसतील.. शिंदेंच्या या योजना बंद..
१.…
— Ambadas Danve (@iambadasdanve) October 13, 2025
शिंदेंच्या या योजना बंद…
आनंदाचा शिधा- बंद!
२. माझी सुंदर शाळा – बंद!
३. १ रुपयात पीकविमा – बंद!
४. स्वच्छता मॉनिटर – बंद!
५. १ राज्य १ गणवेश – बंद!
६. लाडक्या भावाला अपरेंटीसशिप – बंद!
७. योजनादूत योजना – बंद!
८. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना – बंद!
हेही वाचा : मोठी बातमी ! IRCTC प्रकरणी लालू प्रसाद यादव यांचा पाय खोलात ; न्यायालयाने आरोप केले निश्चित





