पिंपरी | झुगरेवाडीतील ग्रामस्थांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश

कर्जत, (वार्ताहर) – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात झुगरेवाडी येथील ग्रामस्थांनी उत्तर रायगडचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत या नेतृत्वावर विश्वास टाकत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी महिला आघाडीच्या संघटिका करुणा बडेकर, पंचायत समितीचे माजी उपसभापती पंढरीनाथ राऊत, राजाराम शेळके, बाजीराव दळवी आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील झुगरेवाडी येथील हनुमंत पारधी, हिरा झुगरे, कानू झुगरे, बीजी पारधी, विमल पारधी, लीला पारधी, रवीना सावळा, पदीबाई पादिर, पदीबाई पारधी, गुना झुगरे, मनीषा पाटील, निर्मला झुगरे, लता खडके, मनीषा घागरे, निशा पाटील, बाली वाघ, रूपाली झुगरे, मीना सावळा, भारती पादिर, सावित्री खडके, काकी पाटील, कविता सावळा, वनिता पादिर,
पदी उपाधीर, हिराबाई पारधी, यमुना पारधी, प्रमिला झुगरे, मनीषा झुगरे, रेश्मा पारधी, पदी गावंडा, गुलाब झुगरे, चाहू पाटील, अनंता जोगरे, देऊ झुगरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी तसेच महिलांनी पक्षप्रवेश केला.
हा पक्षप्रवेश सोहळा कर्जतमधील शिवसेना पक्षाच्या मध्यवर्ती शिवालय कार्यालयात पार पडला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन पक्षप्रवेश करत असल्याचे यावेळी कार्यकर्त्यांनी सांगितले.





